Navpancham Rajyog 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिष्यशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रह आपल्या कक्षेतून गोचर करत असताना विविध राजयोग आणि शुभ संयोग निर्माण होतात, जे मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. अशाच एका दुर्मीळ योगाचा साक्षीदार होणार आहे आगामी ऑगस्ट महिना. ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याची सुरुवात खास असणार आहे. तब्बल ३० वर्षांनंतर शनी आणि बुध एकत्र येऊन ‘नवपंचम राजयोग’ तयार करत आहेत. ज्योतिषशास्त्रात बुध आणि शनी यांचा हा संयोग खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण शनी आणि बुध यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे बुध आणि शनीच्या संयोगातून निर्माण होणारा हा शुभ योग काही राशींच्या व्यक्तींसाठी आयुष्यात सुखाचे क्षण घेऊन येणारा ठरु शकतो. पाहूयात या नशीबवान राशी कोणत्या आहेत…

बुध आणि शनिदेवाच्या ‘नवपंचम राजयोगा’मुळे कोणत्या राशींचे नशीब पालटणार?

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनी ग्रहामुळे निर्माण होणारा नवपंचम राजयोग जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरु शकतो. व्यवसायात भरभराट होऊन नोकरदार वर्गाला पदोन्नती, पगारवाढ यांसारखी उत्तम बातमी मिळण्याची शक्यता आहे. ज्यांनी सरकारी नोकरीसाठी तयारी केली आहे, त्यांना यशाची चिन्हं दिसू शकतात. कलाकार, लेखक, डिझायनर आणि सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. शिवाय अडकलेले धनसुद्धा या काळात प्राप्त होऊ शकते.

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनी ग्रहामुळे निर्माण होणारा नवपंचम राजयोग फलदायी ठरु शकतो. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतो. या काळात मोठा धनलाभ या राशीच्या मंडळींना होऊ शकतो. नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा लाभ होऊ शकतो. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि शनी ग्रहामुळे निर्माण होणारा नवपंचम राजयोग या राशींच्या लोकांसाठी शुभ ठरु शकतो. या काळात सिंह राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना यावेळी नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो, काही लोक विदेश प्रवासाचे सौख्यही अनुभवू शकतात. तसेच या काळात नवे काम सुरू होऊ शकतात ज्याद्वारे तुम्हाला मोठा धनलाभ होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)