Shani-Surya Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार कर्मफळदाता शनी निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन, मार्गी किंवा वक्री अवस्थेत जातो. शनीला एका राशीतून दुसऱ्यात राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे या काळात त्याची काही ग्रहांबरोबर युती निर्माण होते किंवा ग्रहांवर शुभ-अशुभ दृष्टी पडते. येत्या २१ सप्टेंबर २०२५ रोजी शनीची सूर्याबरोबर प्रतियुती निर्माण होत आहे. या खास युतीमुळे १२ पैकी काही राशींना नक्कीच लाभदायी परिणाम जाणवतील.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून १३ मिनिटांनी शनी-सूर्य एकमेकांपासून १८० डिग्रीवर असतील. ज्यामुळे प्रतियुती योग निर्माण होईल. या काळात सूर्य कन्या राशीत विराजमान असेल.
शनी-सूर्य ‘या’ तीन राशींवर मेहरबान
मीन (Meen Rashi)
पिता-पुत्राची जोडी मीन राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमचे भाग्य चमकेल. समाजात मान-सन्मान मिळेल आणि भाग्योदय होईल. आसापासचे वातावरण शांत आणि सकारात्मक राहील ज्यामुळे मन शांत राहील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीसाठी शनी-सूर्याची युती खूप फायदेशीर ठरेल. नोकरी, व्यवसायात मोठा लाभ होईल. आर्थिक बाजू भक्कम होईल. आरोग्य चांगले राहील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात प्रमोशन होईल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
मकर (Makar Rashi)
शनी-सूर्याची प्रतियुती मकर राशीच्या व्यक्तींना पदोपदी यश देईल. आयुष्यात सुखाचे आगमन होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)