Shani Mercury Conjuction 2023: शनि आणि बुध यांच्यात मैत्रीची भावना आहे. २ मार्च २०२३ रोजी शनी आणि बुध दोन्ही एकमेकांच्या जवळ आले आणि दोघेही एकाच नक्षत्रात धनिष्ठात विराजमान होते. शनिदेव वृद्धावस्थाचे प्रतिनिधित्व करतो तर बुध किशोरावस्थाचे प्रतिनिधित्व करतो. शनि सर्वात मंद गती चालणारा ग्रह आहे तर बुध हा सर्वात वेगवान ग्रह आहे. सूर्यदेव देखील बुध आणि शनि सारख्याच राशीत आहे. परंतु तो शतभिषा नक्षत्रात आहे. त्यामुळे शनि बुध अस्त होत आहेत. शनि आणि बुध यांच्या युतीने तीन राशींच्या लोकांना प्रचंड फायदा होईल. या राशींना २ मार्चपासून प्रचंड धनलाभाचे योग बनत आहेत.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध हा दुसऱ्या आणि पाचव्या घराचा स्वामी आहे तर शनी नव्या आणि दहाव्या घरातच स्वामी आहे. त्यामुळे या राशींसाठी शनि आणि बुधची युती फायदेशीर ठरेल. वृषभ राशीची लोक करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतील. तसेच जे व्यवसाय करत आहेत त्यांना अचानक भरपूर फायदा होईल। तसेच याकाळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची देखील शक्यता दिसत आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

मिथुन राशी

मिथुन राशीसाठी आठव्या आणि नवव्या घरातच स्वामी शनी आहे आणि बुध पहिल्या आणि चौथ्या घराचा स्वामी आहे यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळू शकते. तसंच तुम्ही कोणतेही नवीन कार्य करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. दोन मार्चपासून तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायद्याचा ठरू शकतो. याकाळात तुम्हाला पदोन्नती किंवा पगार वाढ होण्याची शक्यता आहे.

( हे ही वाचा: पुढील २५ दिवस ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? शुक्राच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो भरपूर पैसा)

मकर राशी

मकर राशीसाठी बुध सहाव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे आणि शनी पहिल्या आणि दुसऱ्या घराचा स्वामी आहे. शनी बुधची युती मकर राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आर्थिक आणि कौटुंबिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांसाठी हा काय चांगला राहील. तसेच याकाळात तुम्हाला नवीन तसंच अनेक स्तोत्रातून कमाईची शक्यता आहे. याकाळात तुमचे कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण असू शकते. तसंच हा काळ तुम्हाला भरभराटीचा राहील.तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)