Shani Dev Vakri In Meen: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह गोचरसोबत वक्री आणि मार्गस्थदेखील होतात. शनी प्रत्येक राशीत खूप संथ गतीने प्रवास करतो, तो एका राशीत किमान अडीच वर्ष राहतो. इतका काळ शनी एकाच राशीत असला तरी त्याची स्थिती सतत बदलत असते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनीने २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश केला. शनी ग्रह आता गुरुच्या मीन राशीत आहे. आता शनी वक्री होणार आहे. वैदिक पंचांगानुसार, १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ०९:३६ वाजता शनी ग्रह वक्री चाल सुरू करेल, म्हणजेच उलट दिशेने फिरणार आहे. शनी १३८ दिवस वक्री स्थितीत असेल. शनीच्या वक्री चालीमुळे काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात. 

शनी वक्री झाल्याबरोबर ‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

कर्क

शनीची वक्री चाल कर्क राशीच्या लोकांसाठी फार अनुकूल ठरू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकते. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. नशिबाने पूर्ण साथ दिल्याने गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. तुम्ही या काळात पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.

कुंभ

शनीची वक्री चाल कुंभ राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरू शकते. अडकलेले पैसे तुम्हाला या काळात परत मिळू शकतात. कामात आणि योजनांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. अनपेक्षित आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. नव्या नोकरीची संधीदेखील चालून येऊ शकते. या काळात आर्थिक आवक वाढल्यामुळे या राशीच्या लोकांचा बँक बॅलेन्स वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे.

मीन

शनीची वक्री चाल मान राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. गुरु कृपेने तुम्ही पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. बँक बॅलेन्स वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात सुख-शांती नांदण्याची शक्यता आहे. यावेळी धार्मिक कार्यात तुमची रुची वाढू शकते. तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)