Tri Ekadash Yog 2025: शनी आणि अरुण हे दोन बलवान ग्रह, एकमेकांच्या नेमक्या ६० अंशावर येऊन तयार करणार आहेत ‘त्रिएकादश योग’. ही ग्रहस्थिती फक्त सामान्य नाही, तर काही राशींच्या नशिबाचा खेळच बदलू शकते. १२ ऑगस्ट २०२५ रोजी आकाशात हा अद्भुत योग निर्माण होणार आहे. सध्या शनी मीन राशीत आणि अरुण (युरेनस) वृषभ राशीत विराजमान आहेत. पण, या दिवशी हे दोन्ही ग्रह ६० अंशाच्या कोनात एकमेकांना सामोरे येणार आहेत. ही ग्रहस्थिती काही राशींवर अतिशय प्रभावी ठरणार असून, त्यांना धन, कीर्ती व प्रगतीचे अनोखे वरदान मिळू शकते. पैशाने तिजोरी भरून जाणार, करिअर झपाट्याने पुढे जाणार व जीवनात येणार अनपेक्षित संधींचा पाऊस… पण प्रश्न असा— या सुवर्णसंधीचा लाभ कोणत्या ३ भाग्यवान राशींना मिळणार? पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी…
ग्रहस्थितीचा खेळ! ‘या’ राशींना मिळणार संपत्ती, कीर्ती व करिअरमध्ये नवा टप्पा?
कर्क
कर्क राशीच्या मंडळींसाठी हा योग अत्यंत मंगलमय ठरणार आहे. अनेक दिवसांपासून अडकून पडलेली कामे अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठी झेप मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कार्यक्षमतेची दखल घेऊ शकतात. प्रमोशन किंवा पगारवाढीची संधी येऊ शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन आणि घरातील वातावरण आनंदी राहू शकतो. जीवनसाथीसोबतच्या नात्यात गोडवा येऊ शकतो. ट्रिपचा प्लॅनसुद्धा आखला जाऊ शकतो.
वृश्चिक
शनि-अरुण योग वृश्चिक राशीच्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. कुटुंबात सौहार्दता वाढेल, विशेषत: आई-वडिलांशी नात्यात सुधारणा होईल. समाजातील मान्यवर व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित होईल, ज्यातून भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. जमा झालेल्या पैशात वाढ होऊ शकते आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ शुभ ठरु शकतो. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
कुंभ
कुंभ राशीचे लोक जीवनात नवा अध्याय सुरू करतील. व्यापाऱ्यांना व्यवसाय विस्ताराची सुवर्णसंधी मिळू शकेल. आधी केलेल्या गुंतवणुकीतून भरघोस नफा होऊ शकतो. पैतृक संपत्तीचे लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यात सुधारणा होईल आणि आयुष्याचा आनंद घेण्याची संधी मिळेल. तुमच्या वाणीतील गोडवा आणि वागण्यातला सोज्वळपणा सामाजिक प्रतिष्ठा वाढवेल.
हा त्रिएकादश योग फक्त नशीब बदलणारा नाही, तर तुमच्या मेहनतीला सोन्याची किनार लावणारा आहे. त्यामुळे या संधीचा योग्य फायदा घ्या आणि नवीन उपक्रमांसाठी हा दिवस विशेष मानून योजना आखा.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)