Shani Dev Vakri In Meen and Jupiter Rise: यंदाचा श्रावण महिना काहीतरी खास घेऊन येतोय. श्रावण महिना हा भगवान शंकराला अर्पण केला जातो. वैदिक ज्योतिशषास्त्रानुसार, ११ जुलैपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि ९ ऑगस्टला समारोप. या काळात एक अतिदुर्मीळ योग तयार होत आहे, ७ जुलै रोजी देवगुरु बृहस्पति उदय होणार आहेत आणि १३ जुलैला कर्मफलदाता शनी वक्री होणार आहेत. हे संयोग तब्बल ५०० वर्षांनंतर होत असून, यामुळे काही राशींच्या नशिबात बदल होण्याचे संकेत आहेत. करिअर, व्यवसाय, नोकरी, संपत्ती आणि वैवाहिक आयुष्यात मोठा फायदा होण्याचे संकेत दिसून येत आहेत. पाहूया कोणत्या भाग्यशाली राशींना या संयोगाचा जबरदस्त लाभ होऊ शकतो…

श्रावणात शनि व गुरु देणार नशिबात मोठा बदल

वृषभ (Taurus)

शनी व गुरुचा हा बदल वृषभ राशीसाठी फारच शुभ ठरू शकतो. गुरु ग्रह धनभावात उदय होत असून, शनी उत्पन्न स्थानावर वक्री चाल करत आहेत, त्यामुळे अचानक आर्थिक फायदा, उत्पन्नात लक्षणीय वाढ, आणि गुंतवणुकीसाठी योग्य संधी मिळू शकते. दीर्घ प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे, तर संततीबाबत एखादी आनंददायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. पगारवाढीसह पदोन्नतीची शक्यता आहे. पैशांची बचतही यशस्वीपणे करता येईल.

कर्क (Cancer)

कर्क राशीसाठी गुरु ग्रह १२व्या स्थानावर आणि शनी नवम भावावर वक्री होणार आहेत, त्यामुळे धार्मिक व मांगलिक कार्यात सहभाग, देश-विदेश प्रवासाचे योग, आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. व्यवसायात आणि करिअरमध्ये यशस्वी वाटचाल होणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना भरभराट करणाऱ्या ऑर्डर मिळू शकतात. या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी लाभण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरु प्रथम भावात उदय होतील तर शनी कर्मभावावर वक्री होतील, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल, बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकेल, आणि वैवाहिक तसेच प्रेम जीवनात स्थैर्य येईल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन साधन लाभण्याची शक्यता आहे. या कालावधीत परदेश प्रवास होऊ शकतो. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. तुम्हाला भागीदारीच्या कामातही यश मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंध अधिक दृढ होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)