Numerology Traits and Destiny: घरात पैशांचा ओघ वाढलेला असतो, नशीब नेहमी त्यांच्या बाजूने असतं आणि संपत्ती जणू त्यांच्या मागे धावत येते… असं काही लोकांविषयी तुम्ही ऐकलं असेल ना? पण प्रश्न असा, हे नेमकं का घडतं? त्यामागे नशिबाचा, ग्रहांचा आणि अंकांचा नेमका संबंध काय असतो? याचं उत्तर अंकज्योतिषशास्त्रात दडलेलं आहे.
अंकज्योतिष सांगतं, प्रत्येक अंक म्हणजे एक ऊर्जा, एक ग्रह आणि एक वेगळं व्यक्तिमत्त्व. या ऊर्जांचा परिणाम थेट व्यक्तीचा स्वभाव, करिअर आणि आयुष्यावर होतो. ज्यांचा जन्म काही खास तारखांना झाला आहे, ते लोक राहू ग्रहाच्या प्रभावाखाली येतात आणि त्यांचं आयुष्य अचानक चमकदार होतं, जणू काही नशिबाची लॉटरीच लागते.
मेहनती पण रहस्यमय व्यक्तिमत्त्व
या तारखांना जन्मलेले लोक अत्यंत मेहनती, शिस्तप्रिय आणि ध्येयवादी असतात. पण, त्याचवेळी त्यांच्यात एक गूढपणा दडलेला असतो. हे लोक काहीतरी वेगळं करायचं ठरवतात आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. इतरांना जिथं थांबायचं वाटतं, तिथूनच हे लोक सुरुवात करतात.
त्यांच्या मेंदूचा वेग, विचारांची खोली आणि निर्णयक्षमता त्यांना गर्दीतून वेगळी ओळख मिळवून देते. काही वेळा हेच धाडस त्यांना अचानक श्रीमंत बनवतं मग ते व्यवसाय असो, गुंतवणूक असो किंवा कोणती नवी कल्पना असो.
धोका पत्करण्याची वृत्ती आणि असामान्य बुद्धी
या लोकांचं आयुष्य सरळ रेषेत चालत नाही. ते धोका घ्यायला घाबरत नाहीत. कुणी “नको” म्हटलं तरी ते “पाहूया” म्हणतात. काही वेळा हे निर्णय जोखमीचे ठरतात, पण काही वेळा याच धाडसामुळे त्यांना अफाट यश मिळतं.
त्यांच्यातली सर्जनशीलता आणि वेगळे विचार करण्याची क्षमता त्यांना नेहमी नवनवीन संधींच्या शोधात ठेवते. हे लोक नेहमी पुढे काय करू शकतो या विचारात गुंतलेले असतात.
यश मिळवण्याचे क्षेत्र
अंकशास्त्रानुसार हे लोक मीडिया, राजकारण, कायदा किंवा संशोधन क्षेत्रात उत्तम प्रगती करतात. त्यांच्या तल्लख बुद्धीमुळे आणि ठाम निर्णयक्षमतेमुळे ते लोकांना प्रभावित करतात. काही वेळा त्यांचे विचार इतरांना समजायला वेळ लागतो, पण काळ जसजसा पुढे जातो, तसतसे त्यांचे निर्णय ‘बरोबर’ ठरतात.
धार्मिक आणि प्रामाणिक वृत्ती
हे लोक बाहेरून कितीही आत्मविश्वासू दिसले तरी आतून अत्यंत प्रामाणिक आणि धार्मिक असतात. ते आपली मेहनत, नियमबद्धता आणि नैतिकता यांवर विश्वास ठेवतात, म्हणूनच समाजात त्यांचा आदर वाढत जातो आणि अनेकदा लोक त्यांना मार्गदर्शक मानतात.
स्पष्टवक्ते आणि मदतीला तत्पर
हे लोक थेट बोलतात, मनातलं सरळ सांगतात, त्यामुळे काहींना ते कठोर वाटतात, पण ते मनाने उदार असतात. कोणाला मदत हवी असेल तर हे लोक सर्वात आधी पुढे येतात.
अखेर कोणत्या जन्मतारखेला आहे हा अंक’?
अंकज्योतिषानुसार, ज्यांचा जन्म ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ४ (राहू ग्रह) असतो. राहू ग्रह म्हणजे रहस्य, गूढता आणि अनपेक्षित यशाचं प्रतीक. या लोकांना जीवनात अचानक श्रीमंती, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळते; पण ते सगळं त्यांच्या मेहनतीमुळे आणि अपूर्व विचारक्षमतेमुळे.
म्हणजेच जर तुमचा जन्म या तारखांपैकी कोणत्याही दिवशी झाला असेल, तर तुमचं नशीबही एक दिवस चकाकणारं ठरू शकतं.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
