Mangal Transit in Tula: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह साडेतीन ते दीड महिन्यांच्या कालावधीत एकदा राशी बदल करतात. प्रत्येक वेळी हा गोचर मानवी जीवन, करिअर आणि देश-परदेशाच्या घडामोडींवर मोठा प्रभाव टाकतो. आता पुन्हा एकदा १३ सप्टेंबर हा दिवस खास ठरणार आहे, कारण भूमिपुत्र मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. हा बदल काही राशींसाठी भाग्यवर्धक ठरणार असून, आर्थिक वृद्धी, नवी नोकरी आणि अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया कोणत्या राशींना या बदलाचा सर्वाधिक फायदा होणार आहे…

१८ महिन्यांनंतर मंगळ शुक्राच्या घरात! ‘या’ भाग्यवान राशींना मिळू शकतो पैसा

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळाचा हा गोचर अत्यंत शुभ ठरणार आहे. कारण मंगळ तुमच्या लग्न भावात भ्रमण करणार आहेत, त्यामुळे व्यक्तिमत्त्वात आकर्षक तेज येईल, आत्मविश्वास आणि पराक्रम वाढेल. नोकरीत बढती मिळू शकते किंवा नवा प्रोजेक्ट हातात येऊ शकतो. घरात सकारात्मकतेचा संचार होईल आणि नातेसंबंधात सौहार्द वाढेल. विद्यार्थ्यांना प्रभावशाली व्यक्तींचे मार्गदर्शन मिळू शकते, ज्यामुळे करिअरची दिशा ठरेल. विवाहितांसाठी हा काळ आनंददायी राहील, तसेच पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना भरघोस नफा होण्याची शक्यता आहे.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक उन्नती घडवून आणणारा ठरणार आहे. मंगळ धन भावात भ्रमण करणार असल्याने अचानक पैशाची प्राप्ती होऊ शकते. व्यापाऱ्यांना अडकलेला पैसा परत मिळू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांचा नफा वाढू शकतो. घरात सुख-समृद्धी येईल. तुमची वाणी अधिक प्रभावशाली होईल, ज्याचा फायदा व्यवहारात आणि व्यावसायिक सौद्यांमध्ये मिळेल. विशेषतः मार्केटिंग, बँकिंग, मीडिया किंवा बोलण्याशी संबंधित क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ सोन्याची संधी घेऊन येईल.

कुंभ

कुंभ राशीसाठी हा काळ भाग्यदायी ठरणार आहे, कारण मंगळ भाग्य स्थानात भ्रमण करणार आहेत, त्यामुळे नशिबाची साथ लाभेल. उच्च शिक्षण, अध्यात्मिक प्रगती आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी हा काळ अनुकूल आहे. विदेशाशी संबंधित संपर्क वाढतील आणि त्यातून लाभ मिळू शकतो. विद्यार्थी विदेशात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात. अध्यात्मिक आणि बौद्धिक कार्यातही प्रगती होईल.

तर तयार राहा! १३ सप्टेंबरपासून मंगळाचा हा महत्त्वाचा बदल तुमचं नशीब पूर्णपणे पलटवू शकतो. या राशींच्या जीवनात एकदम नवी उमेद आणि समृद्धी येणार आहे…

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)