September Horoscope: सप्टेंबर महिन्यात होणारे ग्रहांचे बदल जीवनात मोठा फरक घडवणार आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये ४ महत्वाचे ग्रह बदलणार आहेत, ज्यामुळे ३ राशींना भरपूर धनलाभ होऊ शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात ४ ग्रह आपली चाल बदलणार आहेत. सप्टेंबरमध्ये सूर्य गोचर, मंगळ गोचर, बुध गोचर आणि शुक्र गोचर होईल. त्याचबरोबर ग्रहांचे नक्षत्र बदलही होतील.
१३ सप्टेंबरला मंगळ गोचर करून तुला राशीत प्रवेश करेल. त्यानंतर तो २ वेळा नक्षत्र बदल करेल. १७ सप्टेंबरला सूर्य गोचर होईल. मग सूर्य नक्षत्र बदल करून पूर्वा फाल्गुनी, उत्तर फाल्गुनी आणि हस्त नक्षत्रात जाईल. सूर्य गोचर आणि बुध गोचरामुळे बुधादित्य योग तयार होईल. त्याशिवाय शुक्राचे २ वेळा राशी बदल आणि २ वेळा नक्षत्र बदल होतील. या ग्रह बदलांचा ३ राशींवर चांगला परिणाम होईल.
मेष राशी (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरमधले ग्रह बदल फायदेशीर ठरतील. खूप दिवसांपासून अडकलेली कामं आता पूर्ण होतील. कुटुंबासोबत छान वेळ घालवाल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात फायदा होईल.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना हा काळ मोठा फायदा देऊ शकतो. भौतिक सुख वाढतील. पैसा मिळेल. मान-सन्मान मिळेल. जे लोक घर, दुकान किंवा वाहन घेऊ इच्छितात, त्यांची योजना पूर्ण होऊ शकते.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात नशिबाची साथ मिळेल. काही लोकांना भरपूर पैसा मिळू शकतो. खास करून राजकारणाशी संबंधित लोकांना मान-सन्मान आणि पद मिळेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)