September Horoscope: वैदिक पंचांगानुसार सप्टेंबर महिन्यात अनेक ग्रह राशी बदलणार आहेत. याचा परिणाम माणसांच्या जीवनावर आणि देश-विदेशावर दिसून येईल. सप्टेंबर महिन्यात सूर्याबरोबरच मंगळ, बुध आणि शुक्र हे ग्रहही राशी बदलणार आहेत. ग्रहांचा सेनापती मंगळ १३ सप्टेंबरला तूळ राशीत प्रवेश करेल. तूळ राशीवर शुक्र ग्रहाचा अधिकार आहे.
ग्रहांचा राजा सूर्य १७ सप्टेंबरला कन्या राशीत प्रवेश करेल. त्याआधी १५ सप्टेंबरला धन देणारा शुक्र सिंह राशीत जाईल. त्याच दिवशी बुधही कन्या राशीत जाईल. म्हणजे या महिन्यात बुध आणि सूर्य मिळून कन्या राशीत बुधादित्य योग तयार करतील. या ग्रहांच्या बदलामुळे काही राशींच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते चला तर मग पाहू या त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
वृषभ राशी (Taurus Horoscope)
तुमच्यासाठी ४ ग्रहांच्या बदलामुळे चांगले फायदे होऊ शकतात. या काळात काम-व्यवसायात प्रगती होईल. व्यापाऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. घरातील वातावरणही आनंदी राहील. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. नातेसंबंधातही समजूत राहील आणि जोडीदारासोबत भावनिक नाते मजबूत होईल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
तुमच्यासाठी ४ ग्रहांच्या बदलामुळे चांगले परिणाम मिळू शकतात. या काळात तुम्हाला अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगला ताळमेळ राहील. विद्यार्थ्यांच्या मनातील अनिश्चिततेची भीती कमी होईल. समाजातील गैरसमज दूर होतील आणि मान-सन्मान मिळेल. करिअरशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. लग्नसंबंध आणि प्रेमसंबंधातही सुधारणा होईल. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुम्ही पैसे साठवण्यात यशस्वी व्हाल.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
तुमच्यासाठी सप्टेंबर महिना अनुकूल ठरू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. घरगुती जीवनात सुख आणि शांती मिळेल. घर सजवणे, नवे फर्निचर घेणे किंवा घर-जमिनीशी संबंधित निर्णय घेण्यासाठी हा काळ योग्य आहे. या काळात नशिबाची साथ मिळेल आणि अडकलेली कामे पूर्ण होतील. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना पैसे कमावण्याचे नवे मार्ग मिळतील. गुंतवणुकीतूनही फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना मानसिक शांती मिळेल. तसेच मान-सन्मान मिळण्याची संधीही मिळेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)