शनि अमावस्येला शास्त्रांमध्ये विशेष महत्त्व आहे. जेव्हा अमावस्या शनिवारी येते तेव्हा त्याला शनि अमावस्या म्हणतात. विशेषत: या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. यावेळी २१ जानेवारीला शनि अमावस्या येत आहे. यासोबतच या दिवशी मौनी अमावस्याही आहे आणि ३० वर्षांनंतर शनिदेव कुंभ राशीत असल्याने हाही दुर्मिळ योगायोग बनला आहे. यासोबतच या दिवशी इतर ४ योगही तयार होत आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. शनि अमावस्या काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. यादिवसापासून काही राशींना शनिची साथ मिळणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी..

कन्या राशी

शनि अमावस्या तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. नोकरी करत असणाऱ्यांसाठी यावेळी वेतनवाढ आणि पदोन्नती होण्याची शक्यता दिसत आहे. याकाळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. यासोबतच तुमच्या जोडीदारासोबत असलेले नाते सुधारेल. याकाळात तुम्ही कोणताही निर्णय घेताना घाईघाईने घेऊ नका याने तुमचेच नुकसान होऊ शकते. याकाळात तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत देखील बदल करणे गरजेचे आहे. तुमच्या लकी नंबर ४ तर शुभ रंग सिल्वर आहे.

धनु राशी

शनि अमावस्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. याकाळात तुम्ही निसर्गासोबत चांगला वेळ घालवा यामुळे तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील. यासोबतच तुमच्या जीवनशैलीत नवीन सवयी तयार करा याने भरपूर फायदा होईल. याकाळात अनेक दिवसांपासून सुरू असलेला कौटुंबिक वाद सुटेल. याकाळात तुम्हाला लांबचा प्रवास करण्याची संधी मिळेल. तसच कुटुंबात देखील शुभ कार्यक्रम होऊ शकतात.

( हे ही वाचा: ‘शश महापुरुष राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? शनिदेव वर्षभर देऊ शकतात प्रचंड पैसा)

कुंभ राशी

याकाळात तुमच्या कटुंबातील चालत असलेले जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. शनि अमावस्येपासून तुमच्या जीवनात अनेक बदल घडतील. याकाळात तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होईल यामुळे तुमचे नाते संबंध सुधारतील. तसंच तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. याकाळात जास्त गुंतवणूक करणे टाळा. याने बऱ्याच समस्या सुटतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)