Shani Amavasya 2025 Surya Grahan Sanyog : ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी २९ मार्च रोजी पहिले सूर्य ग्रहण लागणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हे एक आंशिक सूर्य ग्रहण असणार. या वेळी शनि अमावस्येच्या दिवशी सूर्य ग्रहणाचा खास संयोग निर्माण होणार आहे. या शिवाय या दिवशी शनि देव अडीच वर्षानंतर राशी परिवर्तन करणार. या दिवशी शनि देव कुंभपासून मीन राशीमध्ये प्रवेश करणार. हा सूर्य ग्रहण उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये लागणार आहे. त्यामुळे या नक्षत्रामध्ये जन्मलेल्या लोकांसाठी सूर्य ग्रहण खूप खास असणार आहे. अशात शनि अमावस्येला सूर्य ग्रहण कोणत्या पाच राशींसाठी खास असणार आहे, हे जाणून घेऊ या.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य ग्रहण आर्थिक स्वरुपाने अनुकूल मानले जाते. सूर्य ग्रहणाचा शुभ प्रभाव या आर्थिक स्थितीमध्ये मजबूत राहीन. या दरम्यान नशीबाची या लोकांना पुरे पुर साथ मिळेल. तसेच या दरम्यान खर्चावर विशेष नियंत्रण दिसून येईल. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहीन.

कर्क राशी

वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण आणि शनिचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि फायद्याचे ठरणार आहे. या सूर्य ग्रहणाचा शुभ प्रभाव नोकरी आणि व्यवसायात जबरदस्त आर्थिक प्रगती घेऊन येणार ठरणार. व्यवसायात धन स्थिती उत्तम राहीन. मित्रांच्या सहकार्याने नोकरीमध्ये चांगली संधी मिळू शकते. न्यायालयीन वादविवादांपासून सुटका मिळू शकते.

तुळ राशी

सूर्य ग्रहणाचा शुभ प्रभाव कौटुंबिक जीवनात आनंद घेऊन येईल. कुटुंबातील सदस्यांबरोबर या लोकांचा गैरसमज दूर होईल. दांपत्य जीवन उत्तम राहीन. नव विवाहित जोडप्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. या दरम्यान व्यवसायात आर्थिक गुंतवणुकीतून मोठा लाभ मिळेन. कार्य क्षेत्रात या लोकांच्या कार्याची खूप प्रशंसा होईल.

मकर राशी

वर्षातील पहिले सूर्य ग्रहण आणि शनिचे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते. शनि देवाच्या विशेष कृपेने बिघडलेले कामे पूर्ण होतील. व्यवसायात पार्टनरचे सहकार्य लाभेल. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगली गोड बातमी मिळू शकते. पितृ संपत्तीमध्ये नफा मिळेल. या दरम्यान गुंतवणूक केल्याने चांगला नफा मिळू शकतो.

मीन राशी

सूर्य ग्रहण आणि शनि गोचरचा संयोग मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायद्याचे आणि शुभ ठरू शकतो. या दरम्यान शनि देवाची विशेष कृपा दिसून येईल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांची जबरदस्त प्रगती दिसून येईल. कुटुंबामध्ये वडील किंवा घरातील वरिष्ठ सदस्याला आर्थिक लाभ होईल. जे काम दीर्घ काळापासून अडकलेले आहे, ते यशस्वीपणे पूर्ण होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)