Shani Asta In 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये शनी हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. या शनीच्या स्थितीमध्ये थोड्या बदलांमुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात चढ उतार होऊ शकतो. शनी सर्वात हळूवार चालणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच वर्ष विराजमान राहतो. या दरम्यान त्याचा अस्त आणि उदय सुद्धा होतो. २०२६ मध्ये शनी मीन राशीतच विराजमान असेल या वर्षात तो अस्त देखील असेल.

वैदिक पंचागनुसार, १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी तो अस्त होणार असून तो २२ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ४९ मिनिटांपर्यंत तब्बल ४० दिवस याच स्थितीमध्ये राहील. शनी अस्त झाल्याने काही राशींना लाभ मिळू शकतो.

२०२६ मध्ये शनी होणार अस्त

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीसाठी शनीची अस्त स्थिती अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. करिअर-नोकरीतमध्ये भरपूर यश मिळेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील, नात्यात गोडवा येईल.

मकर (Makar Rashi)

२०२६ मध्ये शनीची अस्त स्थिती मकर राशीसाठी सकारात्मक सिद्ध होईल. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीसाठी देखील शनीची अस्त स्थिती अत्यंत लाभकारी सिद्ध होईल. मनातील सर्व प्रश्न सुटतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)