Ajit Pawar Astrology: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासहित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरु आहे. अलीकडेच सारथीसारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील यावर विधान परिषदेत चर्चा झाली. यावेळी उत्साहात केलेल्या एका विधानावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अजित पवार व वाद हे समीकरण नेमके कधी सुटणार याविषयी प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी अंदाज वर्तवला आहे. अजित पवारांच्या जन्मतारखेवर आधारित कुंडलीनुसार येत्या वर्षात ग्रहांची उपमुख्यमंत्र्यांना साथ असणार का हे पाहूया..

अजित पवार व पीएचडीचा वाद काय?

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत म्हणाले, “सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती अर्ज करून झाल्यावर समजली होती त्यामुळे या निर्णयाची पुढील वर्षापासून अंमलबजावणी करावी अशी सतेज पाटील यांनी मागणी केली होती. मात्र यावेळी पाटीलांना प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार, यांनी पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत? असे आश्चर्यकारक विधान केले. या विधानावरून महाराष्ट्रभरातून टीका होत असताना पवारांनी आपल्या बोलण्यावर आता दिलगिरी व्यक्त केली आहे.

अजित पवारांच्या अडचणी का वाढतायत?

अजित पवारांना सध्या साडेसाती सुरू असून, चंद्रा वरुन होणारे शनी भ्रमण मंगळ व प्लुटोच्या प्रतीयोगातून होत असल्याने, त्यांना वाढत्या अडचणींचा सामना सातत्याने करावा लागत आहे. सत्तेचा कारक रवी हा मूळ कुंडलीत राहूच्या केंद्रात असल्याने, एक संभ्रमाचे वातावरण सातत्याने तयार होत असते. घेतलेल्या निर्णयात भावनिकता अधिक दिसून येते. मकर राशीत असलेल्या प्लुटोमुळे सत्तेचा कारक रवी पूर्ण बाधीत झाला आहे. मेष राशीत असलेला हर्षल हा अजित पवारांच्या मूळ कुंडलीतील गुरु-बुध यांच्या अशुभयोगातून जात असल्याने, जे ठरवले आहे, त्याप्रमाणे घडून येत नाही, तथापि, पक्षातील वाढती खदखद त्यांना थोपवू शकत नसल्याचेही दिसून येत आहेत.

हे ही वाचा<<“२०२४ मध्ये अजित पवार यांना सत्तेचा… “, उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी ज्योतिषांची महत्त्वाची भविष्यवाणी

अजित पवारांना यश कधी?

दरम्यान, या वर्षाच्या म्हणजे २०२३ च्या शेवटापासून ग्रह त्यांना अनुकूलतेचे दान टाकण्यास सुरुवात करतील. दिनांक २४ एप्रिल २०२४ ला मात्र पापग्रहांना पूर्ण छेद देऊन, सत्तेचा कारक रवी एका काटेरी सिंहासनावर विराजमान होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)