Shani Navpancham Rajyog: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करून इतर ग्रहांबरोबर युती करतात. यामुळे शुभ योग आणि राजयोग तयार होतात. सप्टेंबर महिन्यात ३० वर्षांनंतर शनी आणि बुध यांचा नवपंचम राजयोग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात. तसेच देश-विदेश प्रवासाची संधी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या राशी भाग्यवान आहेत.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

तुमच्यासाठी बुध आणि शनीचा नवपंचम राजयोग फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्ही समाजात जास्त लोकप्रिय व्हाल. तुम्हाला मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. तुमचा व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल आणि आत्मविश्वास वाढेल. हा योग तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल. तसेच तुम्हाला पितृसंपत्तीतून फायदा मिळेल.

या काळात तुमचे मोठ्या लोकांशी संबंध जुळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होईल. प्रेमजीवनात रोमांस आणि उत्साह वाढेल आणि अविवाहितांसाठी नवीन नाती सुरू होऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या देखील हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

नवपंचम राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात नवीन पार्टनरसोबत काम करण्याची संधी मिळेल आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही एखादी मोठी व्यावसायिक डील करू शकता, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या हा काळ सर्जनशील किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी चांगला आहे.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

तुमच्यासाठी नवपंचम राजयोग सकारात्मक ठरू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होतील. हा राजयोग तुमचा सामाजिक गोतावळा वाढवण्यासाठी आणि नवे संबंध जोडण्यासाठी अनुकूल राहील. या काळात अचानक धनलाभ आणि नवे संधी मिळू शकतात. प्रेमसंबंधात गोडवा टिकून राहील. तसेच निर्यात-आयातच्या कामातही फायदा होऊ शकतो.