Shani Budh Vakri 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर राशी किंवा नक्षत्रबदल करतो, ज्याचा परिणाम १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर होत असतो. नऊ ग्रहांपैकी सर्वांत शक्तिशाली ग्रह शनी सध्या मीन राशीत वक्री अवस्थेत आहे. १३ जुलै रोजी तो मीन राशीत वक्री झाला, तर १८ जुलै रोजी बुधदेखील कर्क राशीत वक्री झाला आहे. सध्या शनी आणि बुध एकत्र वक्री स्थितीत असल्याने काही राशींच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. त्यांची दीर्घ काळापासून प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. त्यांना अमाप संपत्ती मिळू शकते. पण, कोणत्या राशींच्या लोकांना याचा फायदा होईल ते जाणून घेऊ…
मेष
शनीी-बुधाची वक्री चाल मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकते. तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या संपुष्टात येऊ शकतात. कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकता. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पुन्हा येऊ शकतात. मालमत्तेच्या बाबतीतील अडथळे दूर होऊ शकतात. तुम्ही नवीन मित्र बनवाल. तसेच जुन्या मित्रांना भेटण्याचा योग येईल. अनावश्यक खर्चापासूनही मुक्ती मिळू शकते. परदेशाशी संबंधित बाबींमध्येही तुम्हाला यश मिळू शकते. आरोग्य चांगले राहणार आहे.
तूळ
शनी आणि बुधाची वक्री चाल तूळ राशीच्या लोकांसाठी अनेक क्षेत्रांमध्ये अनुकूल परिणाम घडवून आणू शकतात. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये प्रचंड यश मिळू शकते. अनेक समस्या सोडवता येऊ शकतात. त्यासोबतच कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेले कलह संपू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ चांगला असू शकतो. पगारवाढीसह पदोन्नतीची शक्यता जास्त आहे. तुम्ही विरोधक किंवा स्पर्धकांवर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी होऊ शकता. तुमचा आत्मविश्वासही वेगाने वाढेल. व्यवसायात तुमची रणनीती किंवा योजना फायदेशीर ठरू शकते. समाजात आदर वाढू शकतो.
कुंभ
शनी व बुध ग्रहाची वक्री चाल कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते. आरोग्य चांगले राहणार आहे; पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. विनाकारण होणारा खर्च आता कमी होईल, तसेच अचानक आर्थिक लाभदेखील होऊ शकतो.