Shani Dev Gochar 2025: ९ ग्रहांमध्ये शनि हे एकमेव असा ग्रह आहे, ज्याची साडेसाती असते. शनि व्यक्तिच्या कर्मानुसार फळ देतो त्यामुळे त्याला कर्मफळदाता असे सुद्धा म्हणतात. तसेच शनि सोने, चांदी, लोह आणि तांब्याच्या पायावर चालतो. शनि हा अडीच वर्षानंतर राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे.

शनि वेगवेगळ्या राशींमध्ये वेगवेगळ्या पायावर चालत आहे. ३ राशींमध्ये शनि चांदीच्या पायावर चालत आहे. यामुळे या लोकांना शनिच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात मोठा लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या त्या कोणत्या ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी शनिचा पाया लकी आहे.

शनिचा पाया म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार शनि राशिचक्रात फिरताना ज्या प्रकारच्या पाऊलाने फिरतो, त्याला शनिचा पाया म्हणतात.

कर्क राशी (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांचे शनिचा चांदीचा पाया अडकलेले काम पूर्ण करेन. कौटुंबिक समस्या दूर होईल. विदेशात प्रवास करू शकतात. धनलाभाची शक्यता आहे. भविष्यासाठी पैसा धन संपत्तीची बचत करू शकता. सर्व गोष्टी या लोकांच्य मनाप्रमाणे होईल. दीर्घकाळापासून मनात असलेली इच्छा पूर्ण होईल. हा काळ कर्क राशीसाठी खूप उत्तम असेन.

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)

कर्मफळदाता शनि वृश्चिक राशीच्या लोकांना चांदीच्या पाऊलांनी चालून भौतिक सुख देतील. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल. नोकरी करणाऱ्या लोकांचा पगार वाढू शकतो. या लोकांना प्रमोशन इंक्रिमेंट मिळू शकते. व्यवसायात लाभ मिळू शकतो. शेअर माक्रेटमध्ये लाभ होईल. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी या लोकांच्या कामाचे कौतुक केले जाईल.

कुंभ राशी (Aquarius Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिचे चांदीच्या पाऊलांनी चालणे अपार धनलाभ देणारे ठरू शकते. या लोकांना प्रमोशन मिळू शकते. करिअरसाठी हा काळ प्रगती करणार आहे. नोकरी शोधणाऱ्या लोकांना नोकरीचे प्रस्ताव मिळू शकतात. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. या लोकांच्या आर्थिक समस्या दूर होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)