Shani Margi 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी हा सर्वात क्रूर ग्रहांपैकी एक मानला जातो. शनी ग्रह प्रत्येक राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनी हा सर्वात मंद गतीने फिरणारा ग्रह मानला जातो. शनी सध्या मीन राशीत असून २०२७ पर्यंत शनी या राशीत राहील. या काळात त्याची स्थिती बदलत राहील. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात शनी मीन राशीत मार्गी होईल. शनीची मार्गी अवस्था १२ पैकी काही राशींना खूप फायदेशीर ठरू शकते.
शनीची मार्गी अवस्था ‘या’ राशींसाठी भाग्यकारी
मकर (Makar Rashi)
मकर राशीसाठी शनीची मार्गी अवस्था खूप अनुकूल सिद्ध होईल. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल.
सिंह (Singh Rashi)
शनीची मार्गी अवस्था सिंह राशीसाठी अत्यंत लाभदायी ठरेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
तूळ (Tula Rashi)
तूळ राशीसाठी शनीची मार्गी अवस्था सकारात्मक ठरेल. या काळात समाजात यश-कीर्ती, वाढेल. आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होईल. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सुख मिळेल, कर्ज फिटण्यास मदत होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
