Shani Favourite Zodiac Signs: कर्मफळ देणारा शनी ग्रह नवग्रहांमध्ये सर्वात प्रभावशाली आणि महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनी हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. तो एका राशीत सुमारे अडीच वर्ष राहतो. त्यामुळे एका राशीत परत यायला जवळपास ३० वर्षे लागतात. शनीला सर्वात क्रूर ग्रह मानले जाते कारण तो प्रत्येकाला त्यांच्या कर्मांनुसार फळ देतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला दुःख, परिश्रम, अडथळे, आजार, दोष, विरोध, भीती, वार्धक्य, दान, आयुष्य, विकृत अवयव यांचा कारक मानले जाते.

शनीची स्थिती बदलली की त्याचा परिणाम शारीरिक, मानसिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक आयुष्यावर दिसतो. पण शनी नेहमी वाईटच परिणाम करतो असे नाही. जर कुंडलीत शनीची स्थिती चांगली असेल तर तो गरीबालाही राजा बनवू शकतो. प्रत्येक राशी एखाद्या ग्रहाशी जोडलेली असते. काही राशींवर शनीदेवाची खास कृपा असते. चला तर मग जाणून घेऊ या त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

वृषभ राशीचे स्वामी दैत्यांचे गुरु शुक्र आहेत. शुक्र आणि शनी परममित्र आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांवर शनिदेवाची खास कृपा असते. शनीच्या स्थितीत बदल झाला की त्याचा परिणाम या राशीच्या लोकांच्या जीवनावरही दिसतो.

या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात, पण ते त्या सहज पार करू शकतात. त्यांना सुख-समृद्धी मिळते. ते खूप मेहनत करतात आणि त्यांना चांगले यशही मिळते. आपल्या मेहनतीच्या जोरावर ते उंच पदावर पोहोचतात. या राशीच्या लोकांना वाहन आणि मालमत्ता देखील मिळते.

तूळ राशी (Libra Horoscope)

शनीच्या आवडत्या राशींमध्ये तूळ राशीला खास स्थान आहे. वैदिक ज्योतिषानुसार शनीची उच्च राशी तूळ मानली जाते, म्हणून या राशीच्या लोकांवर शनिदेवाची नेहमीच खास कृपा असते. तूळ राशीचे लोक मेहनती, शिस्तबद्ध आणि प्रामाणिक स्वभावाचे असतात, त्यामुळे शनिदेव त्यांच्यावर प्रसन्न राहतात.

शनीच्या कृपेने त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि जीवनात सतत प्रगती होते. तसेच त्यांना सुख, समृद्धी आणि मानसिक शांती मिळते आणि आयुष्यात आनंदाची कमी नसते.

मकर राशी (Gemini Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी आणि संघर्ष आले तरी शेवटी त्यांना नक्कीच यश मिळते. शनिदेवाच्या कृपेने हे लोक कठीण परिस्थितीतही धीर धरतात आणि आपल्या ध्येयाकडे सतत पुढे जातात.

मकर राशीचे लोक शिस्तप्रिय, जबाबदार, संयमी आणि दूरदर्शी असतात. त्यांच्यात महत्त्वाकांक्षा खूप असते, जी त्यांना मेहनत करून मोठी ध्येये साध्य करण्यास सक्षम बनवते. आर्थिकदृष्ट्या त्यांची स्थिती चांगली राहते आणि वेळेनुसार त्यांना स्थिरता व समृद्धी मिळते. तसेच शनिदेवाच्या कृपेने जीवनातील त्रास, मानसिक ताण आणि दुःख कमी होतात आणि आत्मविश्वास वाढतो.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीवरही शनिदेवाची खास कृपा असते कारण ती त्यांची मूल त्रिकोण राशी मानली जाते. त्यामुळे या राशीच्या लोकांचे भाग्य जागृत होते आणि जीवनात नवीन संधींचे दरवाजे उघडतात.

शनीच्या कृपेने हे लोक आपल्या प्रयत्नांत सतत यश मिळवतात आणि प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतात. कुंभ राशीच्या लोकांचे जीवन आनंद, संतुलन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. तसेच त्यांच्या वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात सुख, साथ आणि सामंजस्य राहते.

मानसिकदृष्ट्या ते मजबूत असतात आणि कठीण काळातही आपली परिस्थिती सुधारण्याची ताकद ठेवतात. शनिदेवाचे आशीर्वाद त्यांना कायमचे यश, आर्थिक स्थैर्य आणि जीवनात नवीन उपलब्धी देतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)