Shani gochar 2023 saturn planet will make vipreet rajyog these zodiac sign get more money | Loksatta

‘विपरीत राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींचे नशीब पालटणार? २०२३ मध्ये शनिदेव देणार प्रचंड धनलाभाची संधी

Vipreet Rajyog In Kundli: शनिदेव १७ जानेवारी २०२३ रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शनिदेवाचे संक्रमण होताच विपरीत राजयोग तयार होईल, ज्यामुळे काही राशींना धनलाभ होण्याचे योग बनू शकतात.

‘विपरीत राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींचे नशीब पालटणार? २०२३ मध्ये शनिदेव देणार प्रचंड धनलाभाची संधी
फोटो: संग्रहित

Shani Transit Kumbh Zodiac: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी ग्रह सर्वात कमी वेगाने प्रवास करतो. आम्ही तुम्हाला सांगतो की शनि ग्रह १७ जानेवारी २०२२ रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे विपरीत राजयोग निर्माण होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. परंतु अशा ३ राशींचे लोक आहेत, ज्यांच्यासाठी यावेळी चांगला नफा आणि प्रगतीची जोरदार शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

वृषभ राशी

विपरीत राजयोग तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या कुंडलीच्या दहाव्या घरात प्रवेश करणार आहे. जे नोकरी आणि कामाचे ठिकाण मानले जाते. दुसरीकडे हा योग जुळून वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. यासोबतच परदेश प्रवासासाठी शुभ संधी निर्माण होत आहेत. त्याच वेळी, या संक्रमणामुळे, वृषभ राशीच्या लोकांच्या आर्थिक घडामोडींमध्ये बदल होताना दिसून येतील. तसेच, २०२३ मध्ये तुम्हाला चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. तसेच व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो.

( हे ही वाचा: येत्या काही महिन्यात ‘या’ ३ राशींना होणार प्रचंड धनलाभ? तीन मोठे ग्रह उघडतील नशिबाचे दार)

तूळ राशी

तुमच्या संक्रमण कुंडलीच्या पाचव्या घरात विपरीत राजयोग तयार होणार आहे. ज्याला प्रेमाचे स्थान मानले जाते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. यासोबतच कौटुंबिक जीवनात चांगला समन्वय राहील. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. त्याच वेळी, तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील.

धनु राशी

विपरीत राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीतून तिसऱ्या भावात प्रवेश करणार आहेत. जे धैर्य आणि शौर्याचे स्थान मानले जाते. त्यामुळे या वेळी कामाच्या ठिकाणी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. यासोबतच शनिदेवाचे संक्रमण होताच तुम्हा लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. शनिदेवाच्या कृपेने दीर्घकाळ थांबलेली कामेही पूर्ण होऊ शकतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 18:51 IST
Next Story
१६ जानेवारीपर्यंत ‘या’ ३ राशींवर असेल शनिदेवाची वाकडी नजर; होऊ शकते प्रचंड धनहानी! वेळीच व्हा सावध