Saturn Margi In Kumbh: ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत शनीच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांवर जास्त असतो. ज्योतिषशास्त्रात शनिला कर्मदेवता म्हटलं आहे. शनि प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार त्याचे फळ देतो. शनि ग्रह सध्‍या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये शनिदेव मार्गी होणार आहेत. शनिदेव दुर्मिळ राजयोग घडवून आणतील. शनिदेव ‘शश राजयोग’ निर्माण करतील. त्यामुळे काही राशींना शनिदेवाच्या कृपेने आयुष्यात अपार सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया या भाग्यशाली राशी कोणत्या…

शनिदेव ‘या’ राशींना देणार अपार पैसा?

मेष राशी (Aries Zodiac)

शनिदेवाचा दुर्मिळ राजयोग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकतो. मेष राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात सुख समृद्धी नांदण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा लाभ होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात मोठा आणि सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता आहे. कोर्ट केसेसमधून तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही व्यवसाय किंवा करिअरमध्ये चांगला निर्णय घेऊ शकता.

(हे ही वाचा : ५ ऑगस्टपासून ‘या’ राशीधारकांना अपार श्रीमंतीसह लाभेल समृद्धी? बुधदेवाच्या वक्री चालीने मिळू शकतो गडगंज पैसा )

वृषभ राशी (Taurus Zodiac)

दुर्मिळ राजयोग घडल्याने वृषभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. नोकरदारांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. व्यापारी वर्गातील लोकांना चांगला नफा मिळू शकतो. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतो. या काळात धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे समाधान आणि आनंद मिळू शकतो.

मकर राशी (Makar Zodiac)

शनिदेवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. नफा कमावण्याच्या संधी मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक प्रगती होऊ शकते. जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत होते शनिदेव त्यांची मनोकामना पूर्ण करु शकतात. या लोकांच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. घर आणि वाहन खरेदीचे योग जुळून येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ मिळू शकते. व्यवसायातही अपेक्षित लाभ होऊ शकतो. खाजगी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)