Shani Gochar: वैदिक ज्योतिषानुसार शनी देवाला कर्मानुसार फळ देणारे आणि न्याय करणारे देव मानले जाते. म्हणजेच शनी देव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. शनी देव अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. त्याचबरोबर ते मधून मधून नक्षत्रही बदलतात.

सध्या शनी देव उत्तराभाद्रपद नक्षत्रात आहेत आणि ऑक्टोबर महिन्यात ते पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. या नक्षत्राचे स्वामी गुरु ग्रह आहेत. त्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या राशींना भरपूर पैसा, पद आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशी लकी आहेत…

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

शनी देवांचा नक्षत्र बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शनी देव सध्या तुमच्या राशीच्या धन स्थानातून जात आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक पैशाचा लाभ होऊ शकतो. तसेच वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा मिळू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि घरात शुभकार्य होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. याचबरोबर तुम्हाला सन्मान मिळेल आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात चमक येईल. मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल.

तूळ राशी (Libra Horoscope)

शनी देवांचा नक्षत्र बदल तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. कारण शनी देव सध्या तुमच्या राशीच्या सहाव्या स्थानातून जात आहेत. त्यामुळे या काळात कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते. शत्रूंवर विजय मिळेल. आर्थिक स्थिती चांगली होईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना मेहनतीचं फळ मिळेल आणि एखाद्या मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते. या काळात तुमच्या योजना यशस्वी होतील. तसेच या काळात तुम्ही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

शनी देवांचा नक्षत्र बदल तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. कारण शनी देव सध्या तुमच्या गोचर कुंडलीच्या कर्म स्थानातून जात आहेत. त्यामुळे या काळात बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची सौम्य पण प्रभावी बोलण्याची शैली लोकांना प्रभावित करेल. या काळात तुम्हाला धन-संपत्तीचा लाभ तर होईलच, पण वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाने खुश होऊन तुम्हाला नवी जबाबदारी देतील. याचा फायदा तुम्हालाच होईल. व्यापाऱ्यांना देखील चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)