वैदिक ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह, २७ नक्षत्र आणि १२ राशींचे वर्णन आहे. या नऊ ग्रहांमध्ये शनिचे विशेष स्थान आहे. या ग्रहाला न्यायाधीशाचा दर्जा आहे. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. तसेच जेव्हा जेव्हा शनिदेव एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतात तेव्हा काही लोकांवर शनिदेवाच्या अडीचकीचा प्रभाव सुरू होतो, तर काही राशींवरील प्रभाव दूर होतो. न्यायदेवता शनिदेव २९ एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच शनीच्या अडीचकीचा प्रभाव दोन राशींवर पडेल. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या दोन राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंचांगानुसार, सध्या शनि स्वतःच्या मकर राशीत भ्रमण करत आहे. या दरम्यान मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर अडीचकीचा प्रभाव असतो. २९ एप्रिलपासून शनि कुंभ राशीत गोचर करणार आहे. या राशीत शनिचे भ्रमण सुरू होताच मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना अडीचकीपासून मुक्ती मिळेल. दुसरीकडे, कर्क आणि वृश्चिक राशीचे लोक शनिच्या प्रभावाखाली येतील. शनि अडीचकीचा कालावधी अडीच वर्षांचा असतो. या काळात शनि व्यक्तीला कर्मानुसार फळ देतात. जर कुंडलीत शनि सकारात्मक किंवा उच्च स्थानावर बसला असेल तर शनिच्या नकारात्मक परिणामांमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते.

शनिदेवांच्या मूर्तीसमोर दिवा लावा: शनिवार हा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी खास दिवस मानला जातो. या दिवशी शनिदेवाच्या मूर्तीवर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून मोहरीचे तेल अर्पण करावे. तसेच त्यांना काळे वस्त्र अर्पण करावे. यानंतर शनि चालिसाचे पठण करावे.

७ मुखी रुद्राक्ष धारण करा: शनिवारी गंगाजलमध्ये सातमुखी रुद्राक्ष धुवून धारण करा. असे केल्याने सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते. शनिवारी ‘ओम प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:’ आणि ‘ओम शनैश्चराय नमः’या दोन मंत्रांचा जप करा. तसेच या दिवशी गरजूंना काहीतरी दान करा.

Guru Transit 2022: १२ महिन्यानंतर गुरु ग्रह बदलणार रास, ‘या’ तीन राशींना मिळणार आर्थिक लाभ

या वस्तू दान करा: शनिवारी उडीद डाळ, काळे कापड, काळे तीळ, काळे हरभरे यासारख्या काळ्या वस्तू एखाद्या गरीब व्यक्तीला दान केल्याने शनिदेवाची कृपा राहते.

बजरंगबलीची पूजा: शनिवारी शनिदेवासह बजरंगबलीचीही पूजा केली जाते. हनुमानजींच्या भक्तांवर शनिदेव नेहमी कृपा करतात. शनिदेवाची आशीर्वाद मिळवण्यासाठी शनिवारी हनुमान चालिसाचा पाठ अवश्य करा. हनुमानजींचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केल्याने शनिचे सर्व दोष दूर होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani gochar in kumbh rashi 2022 adichki and sadesati rmt
First published on: 26-03-2022 at 13:12 IST