Shodashpanchank Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, शनी हा सर्वांत शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानला जातो. जो प्रत्येक राशीला कर्मानुसार फळ देतो, त्यासह शनी हा एकमेव असा ग्रह आहे, ज्याला साडेसाती आणि धैर्याचा अधिकार आहे. त्यामुळे शनीच्या हालचालींत थोडासा जरी बदल झाला तरी त्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांवर दिसून येतो. त्यात शनी लवकरच वक्री होणार आहे. शनीची वक्री चाल सर्वांत शक्तिशाली मानली जाते. त्यात शनी २४ जुलै रोजी कुंभ राशीत राहून गुरूशी युती करून षोडशपंचक योग तयार करणार आहे. या दुर्मीळ योगाच्या निर्मितीमुळे १२ पैकी तीन राशींना बरेच फायदे मिळू शकतात. पण, कोणत्या राशींना या योगाचा फायदा होईल ते जाणून घेऊ…
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २४ जुलै रोजी शनी आणि गुरू एकमेकांपासून ८० अंशावर असतील, ज्यामुळे षोडशपंचाक योग निर्माण होईल. या शुभ योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मोठे फायदे मिळू शकतात.
मेष
शनी-गुरूचा षोडशपंचक योग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात बऱ्याच काळापासून थांबलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. अनावश्यक खर्चातून आराम मिळू शकतो. परदेशाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासह तुमचा चांगला वेळ जाणार आहे. करिअरमध्ये तुम्ही निश्चित ध्येय ठरवून प्रयत्न केल्यास तुम्हाला यश मिळू शकते. परंतु. कामाच्या ठिकाणी कोणाशीही कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. व्यवसायात बरेच फायदे मिळणार आहे. आयात-निर्यात व्यवसायात खूप वाढ होऊ शकते. जोडीदारासह चांगला वेळ जाईल.
तूळ
शनि-गुरू ग्रहाचा षोडशपंचक योग तूळ राशीच्या लोकांसाठीअनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू असलेल्या प्रत्येक समस्येचे त्यामुळे निराकरण होऊ शकते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. तुमच्या आयुष्यात हळूहळू चांगल्या गोष्टी घडतील. कोणत्याही कामात तुम्ही केलेल्या मेहनतीचे आता फळ मिळू शकते. तुम्ही तुमच्या शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी होऊ शकता. संपत्तीचे नवीन मार्ग खुले होतील. आयुष्यात काही नवीन आश्चर्यकारक गोष्टी घडू शकतात.
कुंभ
षोडशपंचक योग कुंभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते. त्यांच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होऊ शकतात. जोडीदाराच्या आरोग्याच्या समस्या हळूहळू संपू शकतात. त्यासह समाजात त्यांचा आदर वाढू शकतो. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या त्यांच्या समस्या संपू शकतात. त्यांना व्यवसाय क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रगतीसह आर्थिक लाभही मिळू शकतो. मानसिक ताण थोडा कमी होईल.