Shani Mangal Samsaptak Yog: क्रूर ग्रह शनी आणि मंगळ लवकरच एक धोकादायक योग बनवणार आहेत. २८ जुलैला मंगळाच्या गोचरामुळे हा संयोग तयार होईल आणि त्याचा ४ राशींना मोठा त्रास होऊ शकतो.
ज्योतिषानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी बदलतो आणि इतर ग्रहांसोबत मिळून शुभ-अशुभ योग तयार करतो. अग्नी तत्त्वाचा ग्रह मंगळ २८ जुलैला गोचर करून कन्या राशीत जाणार आहे. सध्या शनी मीन राशीत आहे. मंगळाच्या गोचरामुळे शनी आणि मंगळ एकमेकांपासून सातव्या स्थानी असतील आणि त्यामुळे समसप्तक योग तयार होईल.
शनी-मंगळाच्या दृष्टिसंबंधामुळे तयार होणारा समसप्तक योग या ४ राशींसाठी विशेष अशुभ ठरू शकतो. त्याचबरोबर राहूची स्थितीही चांगली नाही. शनी, राहू आणि मंगळ यांची स्थिती देश-विदेशात तणाव वाढवू शकते आणि काही राशींच्या करिअरवर संकट आणू शकते.
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शनीचा समसप्तक योग त्रासदायक ठरू शकतो. कामांमध्ये वारंवार अपयश येईल. बोलण्यात कठोरपणा वाढेल. नातेसंबंध बिघडू शकतात. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक टाळा.
कन्या राशी (Virgo Horoscope)
मंगळाचं गोचर कन्या राशीतच होत आहे आणि तिथेच राहून तो शनिसोबत समसप्तक योग तयार करेल. त्यामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात त्रास होऊ शकतो. नात्यांमध्ये गैरसमज वाढतील. तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. तब्येतही बिघडू शकते.
धनू राशी (Sagittarius Horoscope)
मंगळ आणि शनीचा समसप्तक योग धनू राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. तुम्ही असंतुष्ट आणि अस्वस्थ राहू शकता. नवीन अडचणींचा सामना करावा लागेल. तुमचा द्वेष करणारी व्यक्ती तुमच्याविरुद्ध कट रचू शकते. तुमचं आरोग्य तणावाचं कारण बनू शकतं. मेहनत जास्त करावी लागेल.
मीन राशी (Pisces Horoscope)
मीन राशीतच शनी आहेत आणि मंगळासोबत त्यांची स्थिती या राशीच्या लोकांना त्रास देऊ शकते. एखादी महत्त्वाची व्यक्ती तुमच्यावर नाराज होऊ शकते. गैरसमज वाढतील. शक्य तितकं लोकांशी नीट वागा. कामामध्ये अडचणी येऊ शकतात. वाद-विवाद, भांडणं टाळा.