Samsaptak Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर, वक्री करीत शुभ-अशुभ योग तयार करीत असतात. त्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर दिसून येतो. त्यात २८ जुलै रोजी मंगळ बुध राशीत प्रवेश करणार आहे, तर शनी मीन राशीत गोचर करत आहे. यावेळी मंगळ आणि शनी एकमेकांसमोर आल्याने समसप्तक योग तयार होत आहे, ज्यामुळे काही राशींच्या समस्या वाढू शकतात. तसेच या राशींचे आरोग्य बिघडू शकते. तसेच त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो. पण, कोणत्या राशींना या अडचणींचा सामना करावा लागू शकतो याविषयी जाणून घेऊ..

मेष

शनी-मंगळाच्या समसप्तक योगाने मेष राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमचा अनावश्यक खर्च वाढू शकतो. तुमचे पैसे न्यायालयीन खटले आणि आरोग्यासंबंधित समस्यांवर खर्च होऊ शकतात. त्याच वेळी तुमच्यावर खोटे आरोप होऊ शकतात. शनी देवाच्या साडेसातीमुळे तुम्ही विशेषतः सावधगिरी बाळगली पाहिजे.

मिथुन

शनी-मंगळाचा समसप्तक योग प्रतिकूल ठरू शकतो. शनी वक्री असल्याने तुमच्या नोकरीवर गदा येऊ शकते. त्यामुळे आहे ती नोकरी बदलण्याचा विचार करण्यापेक्षा ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा आणि वाद कसे टाळता येतील ते पाहा. या काळात तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि त्यामुळे अधिक काळजी घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्क

शनी-मंगळाचा समसप्तम योग कर्क राशीसाठी अशुभ ठरू शकतो. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुमचे आरोग्य बिघडू शकते. तसेच एखाद्या गोष्टीवरून मोठा तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात.