Viprit Rajyog 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा सर्वात प्रभावशाली ग्रह मानला जातो. कारण शनी एका राशीत तब्बल अडीच वर्षे राहतो आणि पुन्हा त्याच राशीत येण्यासाठी त्याला जवळपास ३० वर्षे लागतात. सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत असून येत्या २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:२० वाजता तो मार्गी होणार आहे आणि तो मार्गी होताच ‘विपरीत राजयोग’ तयार होणार आहे, ज्याचा जबरदस्त फायदा काही खास राशींना मिळणार आहे.
विशेष म्हणजे, शनी जेव्हा ६, ८ किंवा १२ व्या भावात जातो आणि तो त्या भावाचाच स्वामी असेल, तेव्हा ‘विपरीत राजयोग’ निर्माण होतो. यावेळी शनी सिंह राशीत आठव्या भावात मार्गी होणार असून या योगाचा चमत्कारी प्रभाव काही राशींवर दिसून येईल. कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी पाहूयात…
‘विपरीत राजयोग’; ‘या’ राशींचं नशीब अचानक फळफळणार!
सिंह
शनी या राशीच्या आठव्या भावात प्रवेश करणार आहेत. शिवाय, त्यांची दृष्टी कर्म भाव, धन भाव आणि पंचम भावावर पडणार आहे, त्यामुळे दीर्घकाळ सुरू असलेला संघर्ष संपण्याची शक्यता आहे. व्यवसायात किंवा नोकरीत मोठ्या यशाची शक्यता आहे. प्रमोशन, अचानक लाभ किंवा उच्च पद मिळण्याचे योगही तयार होत आहेत. खासकरून ज्यांना खूप मेहनत करूनही यश मिळत नव्हतं, त्यांना आता मेहनतीचं फळ मिळणार आहे. मोठा धनलाभ होऊ शकतो.
मिथुन
शनी मिथुन राशीत नवव्या भावात मार्गी होणार असून यामुळे या राशीतील लोकांना अचानक मोठा लाभ होऊ शकतो. जुन्या अडथळ्यांतून मार्ग निघेल, थांबलेली कामं पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि नव्या जबाबदाऱ्या मिळून पदोन्नतीचे योग निर्माण होतील. पूर्वीचे गुंतवणुकीचे निर्णय आता फायदेशीर ठरू शकतात. व्यापाऱ्यांनी विशेष लक्ष दिले तर त्यांचा व्यापार चांगला होईल. बँक बॅलेन्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
तूळ
शनी या राशीत सहाव्या भावात मार्गी होत आहेत, जो मेहनतीला यश देणारा भाव मानला जातो, त्यामुळे या राशीतील लोकांच्या कष्टांना फळ मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल, जुने आजार कमी होतील. नोकरीत स्थैर्य मिळेल आणि आर्थिकदृष्ट्याही भरभराट होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी चांगली झाल्याने त्यांना उन्नतीची संधी प्राप्त होऊ शकते. शत्रूंवर मात कराल आणि प्रतिष्ठा वाढेल. पैशांची आवक वाढू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)