Shani Margi Budh Vakri after Diwali: वैदिक ज्योतिषात शनीदेव यांना न्यायाधीश, कर्मफळ देणारे आणि दंड देणारे देव मानले जाते. तर बुध ग्रह हा व्यापार आणि बुद्धी देणारा मानला जातो. शनी आणि बुध यांच्यात मैत्रीचे नाते आहे.
नोव्हेंबर महिन्यात शनीदेव मार्गी होतील आणि बुध ग्रह वक्री होणार आहे, म्हणजेच ते उलट चालतील. याचा परिणाम सर्व राशींवर दिसेल. पण ३ राशी अशा आहेत ज्यांचे भाग्य या काळात उजळू शकते. त्यांना अचानक धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीची संधी मिळू शकते. तसेच वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
तुमच्यासाठी शनी मार्गी आणि बुध वक्री होणे शुभ ठरू शकते. कारण शनीदेव तुमच्या राशीपासून कर्मभावात मार्गी होतील आणि बुध ग्रह सहाव्या भावात वक्री होतील. त्यामुळे या काळात तुम्हाला कामकाजात प्रगती मिळू शकते. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची संधी असेल. कोर्ट-कचेरीची प्रकरणे तुमच्या बाजूने निकाली निघू शकतात. आत्मविश्वासाने केलेल्या कामांमध्ये व्यावसायिकांना नक्कीच यश मिळेल. धन मिळवण्याच्या नवीन संधी मिळतील आणि जुनी गुंतवणूकही फायदा देईल. जे लोक रोजगार शोधत आहेत त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणामुळे नोकरी मिळू शकते.
मकर राशी (Capricorn Horoscope)
शनी मार्गी होणे आणि बुध वक्री होणे मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. कारण शनीदेव तुमच्या राशीपासून तिसऱ्या भावात मार्गी होतील आणि बुध ग्रह पंचम भावात वक्री होतील. त्यामुळे या काळात तुमचे साहस आणि पराक्रम वाढेल. भावंडांचा पाठिंबा मिळेल. संततीकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. तुम्ही तुमच्या निर्णयांवर समाधानी राहाल आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मेहनत घ्याल. याशिवाय कुटुंबीयांशी नाते अधिक गोड होईल आणि मन आनंदी राहील.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
शनीदेवांचे मार्गी होणे आणि बुध ग्रहाचे वक्री होणे तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कारण शनीदेव तुमच्या राशीपासून धन आणि वाणी भावात असतील, तर बुध ग्रह तुमच्या राशीपासून दशम भावात वक्री होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय आर्थिक स्थितीत हळूहळू सुधार होईल आणि गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना नवे संपर्क मिळतील, जे करिअरसाठी फायदेशीर ठरतील. जमिनीवर काही केस सुरू असेल तर ती निकालात निघू शकते. तसेच या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)