शनिदेव अजूनही धनिष्ठा नक्षत्रात विराजमान आहेत. पण होळीनंतर शनिदेव शतभिषा नक्षत्रात विराजमान असतील. होळीनंतर शनिच्या या नक्षत्र बदलाचा अनेक राशींना फायदा होईल. त्याचवेळी काही राशींना शनिदेव अनेक संधी उपलब्ध करून देतील. हे शनि नक्षत्र कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरेल ते जाणून घेऊया..

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी शनिचे नक्षत्र बदल फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होईल. ज्यामुळे तुमची आर्थिक स्तिथी सुधारेल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. तसच याकाळात तुमच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असेल. शनिदेव तुम्हाला धनलाभाची संधी उपलब्ध करून देतील.

कुंभ राशी

शनिदेवाचा नक्षत्र बदल कुंभ राशीसाठी शुभ ठरू शकतो. याकाळात तुम्हाला उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतील. तसंच कुंभ ही शनिदेवाची रास असल्याने तुम्हाला शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. याकाळात तुम्ही आनंदी राहाल.

( हे ही वाचा: बुध अस्त होताच ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? मार्च महिन्यात अचानक होऊ शकते संपत्तीत वाढ)

मकर राशी

शनिदेव धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करताच मकर राशीसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. याकाळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. यासोबत शनिदेवाची विशेष कृपा असल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. होळीनंतर तुम्हाला उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)