26 August Navpancham Rajyog: वैदिक ज्योतिषानुसार सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहेत. शनी जून २०२७ पर्यंत या राशीत राहणार आहेत. या काळात ते इतर ग्रहांसोबत संयोग करतील, ज्यामुळे शुभ-अशुभ योग तयार होत राहतील. लवकरच शनी आणि शुक्र यांचा संयोग होऊन नवपंचम राजयोग तयार होणार आहे. या राजयोगामुळे काही राशीच्या लोकांना खास फायदा होऊ शकतो. खूप दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते आणि पद-प्रतिष्ठा मिळू शकते. चला तर मग पाहूया, कोणत्या तीन राशींना याचा विशेष लाभ मिळणार आहे.

वैदिक पंचांगानुसार २६ ऑगस्टला सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी शुक्र आणि शनी १२० अंशांवर असतील. त्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल. त्या वेळी शनी मीन राशीत आणि शुक्र कर्क राशीत असतील. इथे शुक्राची बुधसोबत युती होऊन लक्ष्मी नारायण योग ही तयार होणार आहे.

मेष राशी (Aries Horoscope)

या राशीसाठी शनी-शुक्राचा नवपंचम राजयोग फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांची खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या राशीत साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. पण शनी वक्री असल्याने त्याचा वाईट परिणाम खूप कमी झाला आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. घर-जमिनीचा आनंद मिळू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहू शकते आणि पैसा साठवण्यातही यश मिळू शकते. नातेवाईकांसोबत संबंध चांगले राहतील. जोडीदारासोबतही चांगला वेळ जाईल. जुने मनमुटाव संपुष्टात येऊ शकतात. आरोग्याची स्थितीही चांगली राहील.

सिंह राशी (Leo Horoscope)

या राशीच्या लोकांसाठी शनी-शुक्राचा नवपंचम राजयोग लकी ठरू शकतो. या राशीत शनी आठव्या भावात वक्री अवस्थेत आहे आणि शुक्र बाराव्या भावात आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत मोठे यश आणि धनलाभ मिळू शकतो. नोकरी आणि व्यवसायातही चांगला फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. सुख-सुविधा वाढतील. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. कुठूनतरी एखादी चांगली बातमी मिळेल. भाऊ-बहिणीसोबतचे संबंध चांगले राहतील. पण कुठल्याही प्रकारच्या वाद-विवादापासून दूर राहा.

मीन राशी (Pisces Horoscope)

या राशीत शनी लग्नात आणि शुक्र पंचम भावात आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी शनी-शुक्राचा नवपंचम राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांची खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुमची सर्जनशीलता वाढू शकते, ज्यामुळे करिअर आणि व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ लाभदायी ठरेल. मन शांत राहील, त्यामुळे अभ्यासावर जास्त लक्ष देता येईल. नीट फोकस केल्याने चांगले यश मिळेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि अनेक क्षेत्रांत यश मिळू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)