Shandi Sadesati on Zodiac Signs: सध्या न्यायाचे देव आणि कर्मफळदाता शनीदेव मीन राशीत भ्रमण करत आहेत. त्यामुळे काही राशीच्या लोकांवर साडेसाती चालू आहे. चला, तर मग आता पाहू या की या राशींना शनीच्या साडेसातीपासून कधी मुक्ती मिळेल.
शनीची साडेसाती कोणत्या राशीच्या लोकांवर आहे हे त्यांच्या कुंडलीत शनीची स्थिती पाहून कळू शकते. पण, जर माणसाचे कर्म चांगले असतील तर शनीची ही दशा त्याला त्रास देत नाही.
उलट, वाईट कर्म करणाऱ्या आणि इतरांशी वाईट वागणाऱ्या व्यक्तींना या काळात त्यांच्या कर्मांचे फळ भोगावे लागते. सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांवर साडेसाती चालू आहे. चला, यापासून या राशींना कधी मुक्ती मिळेल ते पाहू.
मेष राशी (Shani Sadesati on Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांना यापासून मुक्त होण्यासाठी अजून वेळ लागेल. त्यांना शनीच्या साडेसातीपासून ३१ मे २०३२ रोजी मुक्ती मिळेल.
कुंभ राशी (Shani Sadesati on Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे, त्यामुळे शनीचा प्रभाव त्यांच्यावर कमी आहे. कुंभ राशीच्या लोकांना २३ फेब्रुवारी २०२८ रोजी साडेसातीपासून मुक्ती मिळेल.
मीन राशी (Shani Sadesati on Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. साडेसातीचा प्रभाव त्यांच्यावर जास्त राहणार आहे, त्यामुळे त्यांना १७ एप्रिल २०३० रोजी यापासून मुक्ती मिळेल.
शनीची साडेसाती असताना शक्य तितकी आजूबाजूच्या लोकांची मदत करा. शनिवारी शनीच्या मंदिरात जाऊन श्रद्धेने शनीदेवाची पूजा करा. शनी देवाचे मंत्र जपा आणि शनीदोष दूर करा. शनी चालीसाही म्हणू शकता.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)