Navpancham Rajyog: ग्रहांचा राजा सूर्य एका विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो. तो एका राशीत अंदाजे ३० दिवस राहतो. म्हणून त्याच राशीत परत येण्यासाठी १२ महिने लागतात. सूर्याला आत्मा, स्थिती, पिता, सरकार, अहंकार, नेतृत्व, उच्च पदे, राजेशाही आणि सरकारी काम इत्यादींचा कारक मानले जाते. म्हणूनच सूर्याच्या स्थितीत बदल हा १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करेल. सूर्य लवकरच वृश्चिक राशीत प्रवेश करेल, जिथे तो शुक्र आणि मंगळाच्या युतीत असेल. शिवाय १७ नोव्हेंबर रोजी तो शनीशी संयोग करून शक्तिशाली नवपंचम राजयोग तयार करेल.

साधारणपणे सूर्य आण शनि हे पिता-पुत्र मानले जातात, मात्र त्यांच्यात एकमेकांबद्दल शत्रुत्वाची भावना असते. असं असताना मीन राशीत शनीच्या वक्री गतीमुळे कर्क राशीत गरूचा प्रभाव लक्षणीयरित्या वाढेल. परिणामी सूर्य आणि शनीच्या युतीमुळे निर्माण होणारा नवपंचम राजयोग या तीन राशींसाठी खूप भाग्यवान ठरू शकतो. हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे. जाणून घेऊ या भाग्यवान राशीबद्दल…

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २.२३ वाजता शनि आणि सूर्य एकमेकांपासून १० अंशांवर असतील, त्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. सध्या शनि मीन राशीत वक्री गतीत आहे.

मीन राशी

या राशीच्या लग्नाच्या घरात शनि आणि नवव्या घरात सूर्य स्थित असेल. परिणामी, या राशीच्या लोकांसाठी वनपंचम राजयोग खूप भाग्यवान ठरू शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आत्मविश्वास आणि ऊर्जेने परिपूर्ण वाटेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, त्यामुळे ध्येय साध्य होण्यास मदत होईल. वडिलांकडून आणि शिक्षकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. हे लोक नवीन काम सुरू रू शकता. आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि भविष्यासाठी बचत करू शकाल. मोठा बोनस किंवा प्रोात्साहन मिळू शकेल. जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल. नाते मजबूत होईल. व्यवसायातही मोठा नफा मिळू शकेल. तुमचे आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक राशी

या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अनेक प्रकारे महत्त्वाचा ठरू शकतो. तुम्ही कठोर परिश्रमावर अधिक लक्ष केंद्रित कराल त्यामुळे तुम्हाला लक्षणीय नफा मिळू शकेल. जर तुम्ही स्वत:चा व्यवसाय चालवत असाल तर तुम्हाला लक्षणीय नफा मिळू शकेल. तुमच्या कारकि‍र्दीतही तुम्हाला फायदा होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी तमच्या कठोर परिश्रमामुळे पदोन्नती किंवा जबाबदारी वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडतील, त्यामुळे तुम्हाला लक्षणीय रक्कम मिळू शकेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक असू शकतो. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील.

मकर राशी

या राशीच्या लोकांसाठी शनि आणि सूर्याचा नवपंचम राजयोगाच्या दृष्टीने विशेष असू शकतो. या राशीत सूर्य अकराव्या घरात आणि शनि दुसऱ्या घरात स्थित असेल. त्यामुळे या राशीच्या लोकांना अचानक पैसे मिळू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. कुटुंबातील दीर्घकाळापासूनचे वाद संपू शकतात. आनंद तुमच्या दारावर ठोठावू शकतो. तुमच्या नोकरीत तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते. अचानक यश मिळण्याची शक्यता देखील आहे. वडिलोपार्जित व्यवसायातही तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. अचानक मोठा करार होऊ शकतो. आरोग्यही चांगले राहील.