Shani Nakshatra Transit 2024: वैशाख महिण्यातील पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता असे सांगितले जाते. यंदा २३ मे म्हणजेच गुरुवारी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी ग्रहमान हे अत्यंत शुभ असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसा, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शनीची स्थिती काही राशींसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते. ६ मे ला शनीने नक्षत्र परिवर्तन करून पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश घेतला होता. शनीसध्या आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभेत स्थित आहेत. येत्या काही दिवसांमध्येच शनी जयंती सुद्धा साजरी केली जाणार आहे. अशा योगायोगामुळे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कित्येक वर्षांनी शनी स्वतःच्या घरी व पूर्वभाद्रपद नक्षत्रात असणार आहेत. यामुळे ४ राशींवर शनीचा थेट प्रभाव असेल. या राशींना येत्या काळात मालामाल होण्याची संधी सुद्धा शनी महाराज देऊ शकतात. या नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया..
बुद्ध पौर्णिमेला ‘या’ राशींवर शनीकृपेने बरसणार धनाचं चांदणं!
मेष रास (Aries Rashi Bhavishya Today)
मेष राशीच्या मंडळींना अचानक धनलाभ होऊ शकतो ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती भक्कम होऊ शकते. मुळात आपल्या मिळकतीत वाढ झाल्याने येत्या काळात सुद्धा डोक्यावरील कर्जाचा भार कमी करता येईल. आपल्याला पगारवाढीचा योग आहे. कामाची एखादी नवी संधी सुद्धा प्राप्त होऊ शकते. मागील काही दिवसांमध्ये झालेल्या खर्चाची भरपाई बुद्ध पौर्णिमेपासून आपल्याला नशिबाकडून मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यश लाभेल. एकाग्रता वाढल्याने महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकाल. व्याव्य्सायत एखादे मोठे डील पूर्ण होईल. तुम्ही ठरवलेल्या गोष्टी वेळच्या वेळी घडल्याने आयुष्यात थोडा आराम व निवांतपणा अनुभवू शकाल.
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya Today)
बुद्ध पौर्णिमेपासून वृषभ राशीचं मंडळींच्या आयुष्यात अच्छे दिन सुरु होऊ शकतात. आपला आत्मविश्वास वाढीस लागेल. पदोन्नतीचे योग आहेत. आपण ज्या पद व प्रतिष्ठेसाठी झगडत असता ते मिळवण्याच्या दिशेने अनेक पाऊले पुढे जाल. गुंतवणुकीतून विशेष धनलाभ होऊ शकतो. एखाद्या नव्या व्यवसायात पैसे गुंतवायचे असल्यास हा कालावधी शुभ सिद्ध होईल. आपल्यासाठी येणारा प्रत्येक दिवस हा नवनवीन आशा आकांक्षा, स्वप्नपूर्तीच्या संधी घेऊन येणार आहे. खासगी जीवनाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकाल. विवाहइच्छुक मंडळींना चांगले स्थळ चालून येऊ शकते.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya Today)
तूळ राशीच्या मंडळींसाठी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तयार होणारा धन योग हा भाग्य उजळण्याचा संकेत घेऊन येणार आहे. आपल्याला आनंदाचा जणू काही एखादा खजिना हाती लागू शकतो. घरी दारी आनंदी वातावरण असेल. शेअर बाजारात गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. आई वडिलांच्या बाबत एखादी मोठी चिंता दुर होऊ शकते. संपत्तीच्या बाबत खुशखबर मिळण्याची चिन्हे आहेत. मंगलकार्यात आपला सहभाग वाढेल.
हे ही वाचा<< २१ मे पंचांग: नृसिंह जयंतीला स्वाती नक्षत्रात उजळून निघेल तुमचंही नशीब? १२ राशींना मंगळवारी बाप्पा कसा देणार प्रसाद?
कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya Today)
शनीची लाडकी व हक्काची रास आहे कुंभ. शनीचं घर म्हणून वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंभ राशीची खास ओळख आहे. अर्थात त्यामुळे शनीच्या प्रत्येक राजयोगाचा सर्वात उत्तम प्रभाव हा कुंभ राशीत होत असतो. या पुढील काळात सुद्धा कुंभ राशीच्या जातकांना शनी दिशा दर्शवतील. गुंतवणुकीत थोडी जोखीम पत्करावी लागू शकते पण त्यातून मिळणारा नफा सुद्धा तितकाच बलाढ्य असेल. आपल्याला फक्त तज्ज्ञांचा सल्ला व मनाचा कौल ऐकायचा आहे. आपल्या व्यक्तिमत्वाला या काळात वेगळीच ऊर्जा व चमक प्राप्त होईल. वाणीच्या बळावर एखादे अत्यंत महत्त्वाचे काम पूर्ण करू शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)