21st May Panchang & Marathi Horoscope: २१ मे २०२४ ला वैशाख शुक्ल पक्षातील उदया तिथीनुसार त्रयोदशी आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजून ४१ मिनिटांपर्यंत ही तिथी कायम असेल व त्यानंतर चतुर्दशीचा प्रारंभ होईल. २१ मेला दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत व्यतिपात योग्य व त्यानंतर वरीयान योग जागृत असणार आहे. स्वाती नक्षत्राच्या प्रभावाने आज मेष ते मीनपैकी काही राशींच्या नशिबात चमचमते यश येऊ शकते. आजचे दिनविशेष म्हणजे आज नृसिंह जयंतीचा उत्सव पार पडणार आहे. आजचे दैनिक राशी भविष्य तुमच्यासाठी कसे असेल हे पाहूया..

२१ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:- शक्यतो प्रवास टाळावा. कौटुंबिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी केल्या जातील. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

23 May Marathi Panchang Budhha Purnima Shani Nakshtra
२३ मे पंचांग: जोडीदाराचं प्रेम, अपार बुद्धी; बुद्ध पौर्णिमेला शनीचं नक्षत्र जागृत होताच १२ राशींच्या कुंडलीत उलथापालथ, पाहा भविष्य
22nd May Panchang Marathi Rashi Bhavishya Vishakha Nakshtra
२२ मे पंचांग: पौर्णिमेचं पडे चांदणं, आज संध्याकाळी विशाखा नक्षत्रात सुरु होईल शुभ मुहूर्त, लक्ष्मीकृपा तुमच्या राशीत आहे का? पाहा
Four Shubh Rajyog in 2024
७ दिवसांनी ‘या’ ४ राशींचे दिवस बदलतील? चार शुभ राजयोग घडून येताच माता लक्ष्मीच्या कृपेने श्रीमंती चालून येईल दारी!
Budh Ast 2024
२ जूनपासून ‘या’ राशी होणार श्रीमंत, बदलतील दिवस? बुधदेव अस्त स्थितीत येऊन करु शकतात धनवर्षा, दारी येईल लक्ष्मी!
Shani To Open Locker Of Money On Buddha Pornima on 23rd May
शनी खजिन्याचं कुलूप बुद्ध पौर्णिमेला उघडणार; ‘या’ ४ राशींना मिळणार मोठा वाटा, श्रीमंतीसह ‘हे’ लाभ करतील भरभराट
5th June 2024 Marathi Rashi Bhavishya Daily Astrology
५ जून पंचांग: तुम्हाला सुकर्माचे फळ देणार बुधवार; अमावास्येआधी आज मेष ते मीनपैकी तुमच्या राशीच्या नशिबात काय लिहिलंय?
31st May Lakshmi narayan Yog After 12 Months
१२ महिन्यांनी लक्ष्मी नारायण येतायत घरी! ३१ मेपासून महिनाभरात ‘या’ राशींचे दिवस पालटणार; नशिबात प्रचंड धन, आरोग्य, प्रेम
Shani Dev Krupa
शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचे बदलेल भाग्य? ८८ दिवस मिळेल भरपूर पैसा? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

वृषभ:-आपला नावलौकिक लक्षात घेऊन वागावे. काहीसा मानसिक ताण संभवतो. दिवसभर कामाचा व्याप राहील. स्वत:चेच म्हणणे खरे करायला जाल. कौटुंबिक खर्चात वाढ होईल.

मिथुन:-प्रवासात काहीसा त्रास संभवतो. तुमच्या मानाला धक्का लागण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास दोन पावले मागे यावे. स्त्री सौख्याचा लाभ होईल. आपले मत योग्य प्रकारे मांडा.

कर्क:-आवडते पदार्थ खायला मिळतील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. घराबाहेर वावरतांना सतर्क रहा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

सिंह:-तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल. पत्नीशी वादाचे प्रसंग येवू शकतात. हाताखालील लोकांकडून कामे व्यवस्थित पूर्ण करून घ्याल. विरोधकांचा विरोध मावळेल.

कन्या:-कामाचे योग्य नियोजन करावे. दिरंगाईवर मात करावी लागेल. वरिष्ठांचा आदेश वेळेवर पूर्ण करा. मानसिक स्थैर्य जपावे. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

तूळ:-मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. वेळ आणि काम यांची सांगड घाला. मुलांचे वागणे स्वातंत्र्यप्रिय राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक:-तुमचे श्रम वाढू शकतात. पत्नीशी मतभेदाची शक्यता आहे. जुनी प्रकरणे सामोरी येवू शकतात. व्यावसायिक स्थैर्य लाभेल. प्रवासात सावधानता बाळगावी.

धनू:-कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. संसर्गजन्य विकारांपासून जपावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. उपासनेला वेळ मिळेल. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ मिळेल.

मकर:-योग्य वेळी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामे कमी श्रमात पार पडतील. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. नैराश्याला बळी पडू नका. बोलतांना इतरांचे मन दुखवू नका.

कुंभ:-भागीदारीतील प्रश्न सामोपचाराने सोडवाल. चैनीच्या वस्तूंकडे ओढ वाढेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. घरातील टापटि‍पी बाबत आग्रही राहाल. मुलांच्या खोडकरपणात वाढ होईल.

मीन:-इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. कफ विकाराचा त्रास संभवतो. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. निसर्ग सौंदर्यात रमून जाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर