Saturn Dev Transit In Kumbh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाने त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि ते सध्या ० अंशावर प्रवास करत आहेत आणि मूल त्रिकोणपर्यंत ते ० ते २० अंशापर्यंत राहतील. दुसरीकडे, शनि गोचर करत तीन राशींच्या कुंडलीत सोन्याच्या पायाने चालतील. यामुळे या राशींशी संबंधित लोकांना धन आणि प्रगतीचे योग तयार होत आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

मेष राशी

शनिदेव तुमच्या राशीतून सुवर्णमध्यस्थानी प्रवेश करत आहेत आणि शनि तुमच्या राशीतून लाभदायक स्थानात प्रवेश करत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुमच्याकडे पैसे येत राहतील. तसंच अचानक धनलाभही होऊ शकते. दुसरीकडे, शेअर मार्केमध्ये नफा होऊ शकतो. तुम्हाला अशा काही करिअरच्या संधी मिळू शकतात, ज्याचा तुम्ही खूप दिवसांपासून विचार करत होता. मात्र या काळात आरोग्याची काळजी घ्या.

कन्या राशी

शनिदेवाचे संक्रमण तुमच्या राशीतून सुवर्णमध्यस्थानी झाले आहे. यासोबतच शनिदेव तुमच्या संक्रमण कुंडलीच्या सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तसंच तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि यावेळी तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. यासोबतच कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. मात्र यावेळी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी. यावेळी वाहनही जपून चालवावे, कारण अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे.

( हे ही वाचा: ‘त्रिग्रही योग’ बनल्याने ‘या’ राशी होणार धनवान? सूर्यदेव वर्षभर देऊ शकतात प्रचंड पैसा)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभ राशी

शनिदेव तुमच्या राशीतून सुवर्णमध्यस्थ झाले आहेत. त्यामुळे यावेळी तुमची प्रगती होईल. पण मानसिक अस्वस्थता राहील. त्याचबरोबर शनीची साडेसतीही चालू आहे. आरोग्याबाबत अडचणी येतील. पण उत्पन्नात वाढ होईल. तसेच, यावेळी तुम्ही कोणतीही मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. त्याच वेळी, नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. त्याच वेळी, या काळात अविवाहित लोकांकडे लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.