Shani Planet Uday 2024: ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह, बारा राशी आणि २७ नक्षत्रं महत्त्वाची मानली जातात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळात रोज काही ना काही घडामोडी घडत असतात. एका ठरावीक काळानंतर नऊ ग्रह राशिपरिवर्तन करतात. त्यांच्या गोचर भ्रमणामुळे प्रत्येक व्यक्तीला अनुकूल किंवा प्रतिकूल फळं मिळतात. नऊ ग्रहांमध्ये शनिला विशेष महत्त्व असतं. हा ग्रह न्याय आणि कर्माचा कारक मानला जातो. आता १८ मार्च रोजी कुंभ राशीत शनिदेवाचा उदय होणार आहे. होळीपूर्वी होणारा शनिदेवाचा उदय काही राशींसाठी फायदेशीर ठरु शकतो. जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी, ज्यांना शनि देवामुळे सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

‘या’ राशींवर शनिदेवाची कृपा?

सिंह राशी

शनिदेवाचा उदय सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. शनिदेवाच्या कृपेने तुम्ही केलेल्या बहुतेक कामांमध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरी दोन्हीमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते.

Shani Nakshatra Parivartan
पुढील ६ महिने ‘या’ राशींचे नशीब अचानक पलटणार? ३० वर्षानंतर शनिदेवाने नक्षत्र बदल केल्याने मिळू शकतो चांगला पैसा
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा
April 2024 Grah Rashi Parivartan in Marathi
एप्रिल सुरु होताच ‘या’ ६ राशींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? अनेक मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, कुणाला होणार फायदा?
Surya Shani Yuti
शनि-सूर्यदेवाची युती संपल्याने ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

(हे ही वाचा : ‘विपरीत राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधदेवाच्या कृपेने वर्षभरात होऊ शकता गडगंज श्रीमंत)

तूळ राशी

शनिदेवाचा उदय तूळ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. शनिदेवाचा उदय या राशीच्या पाचव्या भावात होणार आहे. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत तुमच्यासाठी खुले होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकते. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी लाभण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. या राशीचे लोक जे व्यापारी आहेत, त्यांना मोठा आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे.  

कुंभ राशी

शनिदेवाचा उदय कुंभ राशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारं ठरु शकते. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यापारात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. शेअर बाजार, लॉटरी यातून फायदा होऊ शकतो. तुम्हाला नोकरीच्या चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. व्यापारी वर्गाला मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)