Shani Vakri 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये शनि देवाला नवग्रहामध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. त्याला न्यायाचे प्रतीक मानले जाते. तो कर्मानुसार व्यक्तीला फळ देतो. मकर आणि कुंभ राशीला स्वामी ग्रह मानले जाते. जेव्हा शनि ग्रह राशी परिवर्तन करतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम लोकांचा जीवनावर होतो. शनि अडीच वर्षानंतर एकदा राशी परिवर्तन करतो. पण या दरम्यान शनिच्या चालीमध्ये परिवर्तन होत असते, ज्याचा थेट प्रभाव बारा राशींवर दिसून येतो.
१३ जुलै २०२५ ला शनि वक्री झाले आहे, जेव्हा कोणताही ग्रह वक्री होतो, तेव्हा हळूवार प्रभाव टाकतो आणि जीवनात अडचणी वाढत जातात.
शनि वक्रीमुळे कोणत्या अडचणी येतात?
शनि देव वक्री होतात म्हणजेच ते उलट चालतात. शनिची ही वक्रदृष्टी काही राशींसाठी चांगली नसते. शनि वक्रीचा थेट परिणाम काही राशींच्या लोकांवर दिसून येतो. त्यांना आर्थिक समस्या, रिलेशनशिपमध्ये अडचणी आणि हेल्थ आणि प्रोफेशनल जीवनात समस्या जाणवू शकतात. कामामध्ये उशीर, मानसिक अस्थिरता आणि जुने आजार उद्भवू शकतात. यांचा खर्च वाढू शकतो. या वेळी त्यांचा स्वत:वरील आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जीवनात नवीन गोष्टीला घेऊन संभ्रम निर्माण होऊ शकतो. विशेषत: शनि जेव्हा मीन राशीमध्ये असतो तेव्हा त्याचा प्रभाव आणखी खोलवर होतो.
शनि वक्रीमुळे कोणत्या राशींवर संकट येणार?
या वर्षी शनि १३८ दिवसापर्यंत वक्री अवस्थेत राहणार आहे. शनिच्या वक्री चालीचा थेट परिणाम मिथुन, तुळ, सिंह आणि मेष राशींवर दिसून येईल. या राशींना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
शनिच्या वाईट प्रभावापासून कशी सुटका मिळवावी?
- ज्या राशींवर शनिच्या वक्री चालीवर वाईट परिणाम पडणार, त्यांना नेहमी सर्व स्वच्छ कपडे परिधान करून शनि मंदिरात जावे आणि मोहरीच्या तेलाने दीप प्रज्वलित करावे. असे केल्याने शनि देवाची विशेष कृपा दिसून येईल.
- शनिवारी काळे तीळ, काळे उडीद डाळ आणि मोहरीचे तेल दान करावे, यामुळे नकारात्मक प्रभाव कमी होईल.
- दररोज शिवला दान जल अर्पण करावे. शक्य होईल तेवढ्या स्वच्छता कामगारांना मदत करावी.
- शनिच्या शांतीसाठी महात्यूंजय मंत्राचा जप करावा.
- मोहरीच्या तेलाने भरलेल्या पातेल्यात स्वत:ची सावली पाहून ते तेल गरजू लोकांना दान करावे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)