Viprit Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहाला कर्मांचे फळ देणारा ग्रह मानलं जातं. जो माणूस चांगले कर्म करतो, प्रामाणिकपणे मेहनत करतो व सत्याच्या मार्गाने चालतो, तसेच इतरांची मदत करतो आणि सर्व जीवांप्रति दया व करुणा भाव ठेवतो, त्याच्यावर शनीची खास कृपा होते. अशा व्यक्तीला जीवनात कोणताही मोठा त्रास सहन करावा लाहत नाही आणि त्याला सर्व सुख-सुविधा, पैसा, पद आणि सन्मान मिळतो.
शनी हा सर्वांत हळू गतीने चालणारा ग्रह आहे. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षं राहतो. सध्या शनी मीन राशीत (गुरूची रास) आहे आणि तेथे अनेक राजयोग तयार करीत आहे. तसेच, जुलै महिन्यात शनी या राशीत वक्री (उलटी चाल) असेल. वक्री स्थितीत शनी मागच्या भावाचंही फळ देतो.
याच उलट्या चालीमुळे शनीने सिंह राशीत एक विशेष राजयोग तयार केला आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकतं. तसेच,नोकरी किंवा व्यवसायातही फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया या भाग्यशाली राशीत काय लिहिलंय…
ज्योतिष शास्त्रानुसार, २९ मार्च रोजी शनीने मीन राशीत प्रवेश केला असून १३ जुलै रोजी शनी याच राशीत वक्री झाला आहे.नोव्हेंबरपर्यंत तो अशाच स्थितीत राहील आणि नंतर मार्गी (सरळ चाल) होईल.
‘विपरीत राजयोग’ तेव्हा तयार होतो, जेव्हा कुंडलीतील सहावा, आठवा किंवा बाराव्या भावाचा स्वामी त्याच सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात गोचर करतो.
शनीच्या सध्याच्या स्थितीप्रमाणे बोलायचं झालं, तर शनी सहाव्या भावाचा स्वामी असून, तो आता आठव्या भावात गोचर करत आहे. त्यामुळे ‘विपरीत राजयोग’ तयार झाला आहे.
सिंह राशी (Leo Zodiac Horoscope)
शनीचं वक्री होऊन विपरीत राजयोग तयार करणं सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. शनी महाराज या राशीच्या लोकांच्या सहाव्या व सातव्या भावाचे स्वामी आहेत आणि सध्या आठव्या भावात वक्री झाले आहेत. त्यामुळे शनी सातव्या भावाचंही फळ सिंह राशीला देतील.
संघर्ष संपेल, अडचणींपासून होईल सुटका (Shani Vakri 2025 Leo Zodiac)
जीवनात खूप काळापासून सुरू असलेल्या अडचणी संपू शकतात. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात मोठं यश मिळू शकतं. तब्येतीशी संबंधित अनेक समस्या कमी होऊ शकतात. जरी सिंह राशीसाठी शनी योगकारक ग्रह नसला तरी या विपरीत राजयोगामुळे पुढील अडीच वर्षांत सिंह राशीच्या लोकांना शनीमुळे मोठे फायदे होऊ शकतात.
तुमच्या आयुष्यातील संघर्ष आणि अडचणींमधून आता सुटका होऊ शकते. कामाच्या ठिकाणी आणि नोकरीतही लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही मेहनत केलीत, तर नक्कीच यश मिळू शकतं.
वक्री स्थितीत शनीची चाल खूपच हळू होते. अशा वेळी तुम्हाला थोडी जास्त मेहनत करावी लागू शकते. जर शनीचा लाभ घ्यायचा असेल, तर शनी जे करायला सांगतो तेच करा.
नोकरी, पैशाची इच्छा होईल पूर्ण
तुमची दिनचर्या शिस्तीने आणि नीटनेटकी ठेवा. काम करताना सेवा भावनेने काम करा. ऑफिसमध्ये सगळ्यांशी चांगलं वागा. तुम्ही जितकं चांगलं वागाल, तितकाच तुमचा सहावा भाव मजबूत होईल.
जेव्हा सहावा भाव मजबूत होतो, तेव्हा कर्जातून सुटका मिळते, शत्रूंपासून बचाव होतो. त्यासोबतच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मोठं यश मिळू शकतं.
शनीच्या विपरीत राजयोगामुळे या राशीच्या लोकांना नोकरीच्या क्षेत्रात चांगला फायदा होऊ शकतो. जे लोक नोकरी शोधत आहेत, त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. जे नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, त्यांच्यासाठीही शनीचं गोचर फायदेशीर ठरू शकतं.
पंचम भावाचे स्वामी गुरू आहेत आणि सध्या शनी गुरुच्या राशीत गोचर करत आहेत. गुरू सध्या लाभाच्या भावात बसले आहेत. अतिचारी अवस्थेमुळे हे लाभ वेगाने मिळू शकतात.
हा लाभ शिक्षणाशी संबंधित असो अथवा मुले, नोकरी, पैसे किंवा तुमच्या कोणत्याही इच्छेच्या पूर्ततेशी संबंधित असो; गुरूच्या प्रभावामुळे प्रत्येक काम जलद गतीनं पूर्ण होऊ शकतं.
इस्टेट, प्रॉपर्टी क्षेत्रात चांगला फायदा
शनी हा रिअल इस्टेट, बांधकाम यांचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे या राशीचे लोक जर रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग, आर्किटेक्ट, बिल्डर, बिल्डिंग मटेरियल सप्लाय यांसारख्या क्षेत्रात काम करत असतील, तर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
त्याशिवाय गुप्त धन मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योग तयार होत आहेत. शनीची दृष्टी धन भावावर पडणार असल्यामुळे धनसाठा (संचय) वाढू शकतो.
न्यायालयीन प्रकरण लागेल मार्गी
जर न्यायालयीन कोणतंही प्रकरण खूप दिवसांपासून प्रलंबित असेल, तर त्याचा निकाल तुमच्या बाजूनं लागू शकतो. तडजोड किंवा समजुतीतून हे प्रकरण सुटू शकतं.
आईच्या माहेरच्या बाजूकडूनही काही मालमत्ता मिळू शकते. अचानक धनलाभ किंवा गुप्त धन मिळण्याची शक्यता आहे. लॉटरी, शेअर मार्केट किंवा इन्शुरन्सद्वारे काही पैसे मिळू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रातही चांगला फायदा होऊ शकतो. व्यवसायासाठी कर्ज सहज मिळू शकतं.