Kumbh Rashi Vakri Shani 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला सर्वात महत्त्वाचा ग्रह मानले जाते. शनिदेव हे कलियुगातील न्यायधिकारी या नात्याने प्रत्येक राशीच्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देत असल्याचा भाविकांचा विश्वास आहे. यामुळेच नवग्रहांच्या हालचालीत शनिदेवाच्या उलाढालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शनीचे एखाद्या राशीच्या गोचर कुंडलीतील स्थान हे त्याचे भविष्य ठरवण्याचे काम करते असे समजले जाते. जेव्हा शनिदेव एखाद्या राशीवर कृपादृष्टीचा वर्षाव करतात तेव्हा त्या राशीचे अच्छे दिन तर जेव्हा वक्र दृष्टीने पाहतात तेव्हा कष्टी दिन सुरु होतात असा समज आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार येत्या १८ दिवसात म्हणजेच १७ जूनला शनी वक्री होऊन उलट चालणे सुरु करणार आहेत. ४ नोव्हेंबर पर्यंत शनीची ही चाल कायम असणार आहे यामुळे काही राशींच्या भाग्यात शुभ प्रभाव दिसून येणार असा अंदाज आहे. या भाग्यवान राशी कोणत्या हे पाहूया…

वक्री शनिदेव ‘या’ राशींना देणार अपार धन?

मिथुन रास (Gemini Zodiac)

शनिदेवाची वक्री चाल मिथुन राशीच्या मंडळींना विशेष प्रगतीची संधी देणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यंदा जानेवारी महिन्यातच मिथुन राशीची शनीच्या साडेसातीतून सुटका झाली आहे त्यामुळे यंदाचे वर्ष या राशीला धनलाभासह मानसिक व शारीरिक विकासाचे ठरू शकते. नव्या कामाची सुरुवात होऊ शकते. तुम्हाला मानसिक ताण देणाऱ्या गोष्टींमधून सुटका होण्याची ही वेळ ठरू शकते. आर्थिक स्थिती उत्तम राहण्याची चिन्हे आहेत. समाजातील सहभाग वाढू शकतो.

Shukra Gochar 2024 malavya yog
१० दिवसांनंतर मिळणार नुसता पैसा; ‘मालव्य राजयोग’ देणार ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रतिष्ठा
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
surya gochar 2024 After 364 days Sun will enter Virgo sign
नुसता पैसा! ३६१ दिवसांनंतर सूर्य करणार कन्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी
Surya Gochar 2024 | sun transit in kanya rashi
Surya Gochar 2024 : सूर्यदेवाच्या कृपेने मिळणार पैसाच पैसा! १६ सप्टेंबरपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार
Transit 2024
९९ वर्षानंतर गुरू, सूर्य आणि मंगळ निर्माण करणार अद्भुत योग! या राशींचे नशीब पटलणार, अचानक धन लाभ होणार
Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज
Shani transit 2024 Next 216 days earn money
पुढचे २१६ दिवस नुसता पैसा; शनीच्या कृपेने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय
Jupiter Nakshatra Transit 202
८९ दिवसांपर्यंत गुरु देणार जगातील प्रत्येक सुख! ‘या’ राशीच्या लोकांच्या दारी येईल लक्ष्मी, मिळेल पैसाच पैसा

तूळ रास (Libra Zodiac)

तूळ रास शनीच्या उलट चालीमुळे लाभदायक काळ अनुभवू शकता. या राशीच्या मंडळींना नोकरीच्या ठिकाणी मोठा धनलाभ होऊ शकतो. ज्या व्यक्ती नव्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आयती संधी चालून येऊ शकते. एखाद्या व्यवसायात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुंतवणूक लाभाची ठरू शकते. प्रेमाची नाती मजबूत होऊ शकतात. एखाद्या छोट्या सहलीलाला जाण्याचा योग आहे.

हे ही वाचा<< लक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत? शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी

धनु रास (Sagittarius Zodiac)

शनीची चाल बदलताच धनु राशीच्या मंडळींना शुभ वार्ता मिळू शकते. करिअरमध्ये प्रगती झाल्याने तुमचा समाजातील मान- सन्मान वाढीस लागू शकतो. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून मोठा धनलाभ होऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढून प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)