Shash Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी देव सुमारे अडीच वर्षांनी राशिबदल करतात. शनी वाला वय, दुःख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, खनिज तेल, कर्मचारी, नोकर, तुरुंग इत्यादींचा कारक मानले जाते. शनी देव मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. तूळ राशी ही शनीची उच्च राशी आहे; तर मेष ही त्याची दुर्बल राशी मानली जाते. शनी देवाचा तूळ राशीत असल्याने शश राजयोग निर्माण होत आहे.

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शश राजयोग निर्माण होतो, त्या व्यक्तींना जीवनात सर्व भौतिक सुखे मिळतात. तसेच त्या व्यक्ती खूप श्रीमंत होतात, समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात, त्यांना मान आणि प्रतिष्ठा मिळते. त्यांच्यावर शनी देवाचे विशेष आशीर्वाद असतात. शश राजयोगाच्या निर्मितीने कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊ…

शश राजयोग कसा निर्माण होतो?

जेव्हा शनी लग्न किंवा चंद्र घरापासून मध्यस्थानी असतो तेव्हा हा राजयोग तयार होत. म्हणजेच जर शनी देव लग्न किंवा चंद्रापासून पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या स्थानावर तूळ, मकर किंवा कुंभ राशीत स्थित असेल, तर अशा कुंडलीत शश राजयोग तयार होतो.

जर शनी देव तूळ राशीत असेल, तर हा योग खूप शुभ फळ देतो. कारण- तूळ रास शनी देवाची उच्च स्थानावरील रास मानली जाते. म्हणूनच असे लोक खूप श्रीमंत असतात. त्याच वेळी हे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. या लोकांना स्वातंत्र्य आवडते, कोणाच्याही दबावाखाली ते काम करू शकत नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनी देवाची विशेष कृपा

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शश राजयोग निर्माण होतो, त्यांना शनी देवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. तसेच असे लोक न्यायी असतात, नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. ते मेहनती आणि जिद्दी असतात. तसेच अशा लोकांची आर्थिक स्थिती खूप चांगली राहते. या लोकांना त्यांची कामे वेळेवर पूर्ण करायला आवडते. हे लोक देणगी देण्यात पुढे आहेत.