Surya Gochar 2025: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. श्रावण महिना भोलेनाथ म्हणजेच भगवान शिव शंकराला समर्पित आहे. भोलेनाथाचे भक्त पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने श्रावण महिन्यात शंकराची पूजा करतात. पण, श्रावण सुरू होण्याआधीच काहींना तो लाभदायी ठरणार आहे.
वैदिक पंचांगानुसार, यावर्षी श्रावण २५ जुलै २०२५ (शुक्रवार) पासून सुरू होणार आहे, जो २३ ऑगस्ट २०२५ रोजी समाप्त होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावण महिन्याच्या आठ दिवसाआधीच सूर्यदेवाचं गोचर होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य एका राशीत सुमारे एक महिना असतो आणि त्यानंतर तो पुढील राशीत प्रवेश करतो. सूर्याचे राशीतील हे बदल (गोचर) सर्व राशींवर परिणाम करतात असे मानले जाते.
सूर्य गोचर (Surya Gochar Before Shravan)
सूर्यदेव १६ जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करतील. हे गोचर श्रावणाआधीच होत असल्याने काही राशींवर सूर्यदेव आणि महादेवांची विशेष कृपा राहील. चला तर मग पाहूया, या वर्षी कोणत्या राशींवर सूर्यदेव आणि महादेवाची कृपा होणार आहे.
वृषभ राशी (Taurus Horoscope in Marathi)
भोलेनाथ आणि सूर्यदेवाची कृपा वृषभ राशीच्या लोकांवर राहू शकते. त्यांना धन मिळवण्याची चांगली संधी मिळू शकते. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल, तसेच नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल.
सिंह राशी (Leo Horoscope in Marathi)
सिंह राशीच्या लोकांसाठी व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी टीम वर्क करणे आणि सहकार्य करणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. याशिवाय सूर्यदेव आणि महादेवांची पूजा करणंदेखील लाभदायक मानलं जात आहे.
कन्या राशी (Virgo Horoscope in Marathi)
भोलेनाथ आणि सूर्यदेवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना धन लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील आणि आपापसातील नात्यांमध्ये सुधारणा होईल. समाजात कुटुंबाची मान-प्रतिष्ठा वाढेल.
मीन राशी (Pisces Horoscope in Marathi)
मीन राशीच्या लोकांना व्यवसायात प्रगतीची दाट शक्यता आहे. कामाची कार्यक्षमता वाढेल आणि कामाच्या ठिकाणी मित्रांकडून तुम्हाला पाठिंबा मिळू शकेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठे यश मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.