Shravan 2024 Shubh Yog: सनातन हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात शंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असं म्हटलं जातं. यावर्षीचा भगवान महादेवाच्या उपासनेचा श्रावण मास आज ५ ऑगस्ट रोजी सुरू होत असून, तीन सप्टेंबरला या महिन्याची समाप्ती होत आहे. यावर्षी श्रावण मास सोमवारी सुरू होणार असून, सोमवारीच समाप्ती होत आहे. त्यामुळे यावर्षी महादेवाच्या भक्तांसाठी पाच सोमवारचा अनोखा योग जुळून आला आहे. श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी असण्याचा दुर्मिळ योग ७० वर्षांपूर्वी तयार झाला होता. यावेळी श्रावणामध्ये काही शुभयोगही तयार होत आहेत. यंदा श्रावण महिन्यात रवि योग, शुक्रादित्य योग, गजकेसरी योग, हर्ष योग, सौभाग्य योग, बुधादित्य योग, कुबेर योग, षष्ठ योग, वज्र योग आणि नवपंचम योग तयार होत आहेत. त्यामुळे काही राशींच्या जीवनात याचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. त्यांना आयुष्यात अपार यश, सुख, लाभण्याची शक्यता आहे. पाहूयात या भाग्यशाली राशी कोणत्या…

‘या’ राशींचे उजळणार भाग्य?

कन्या राशी

श्रावणामध्ये शुभयोग बनल्याने कन्या राशींच्या लोकांना चांगले दिवस पाहायला मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या राशीच्या लोकांना नवीन आणि उत्कृष्ट नोकरीच्या संधी मिळू शकतात. जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकतात आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.

(हे ही वाचा : शनिदेव येणारे ४ महिने ‘या’ राशींवर असणार मेहेरबान; तीन राशींचे अच्छे दिन? तुमच्या कुंडलीत आर्थिक बळ कसंय?)

कुंभ राशी

शुभ योग जुळून आल्याने यंदाच्या श्रावणामध्ये कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होतेय. शेअर मार्केटमधून भरपूर पैसा हाती लागू शकतो. जीवनात भौतिक सुख मिळण्याची शक्यता आहे. पैसे येण्याचे काही नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो. नोकरदार वर्गाला प्रगतीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात यश मिळू शकतो. वैवाहिक जीवन चांगलं राहण्याची शक्यता आहे.

धनु राशी

यंदाच्या श्रावणामध्ये धनु राशीच्या लोकांना सुख समाधान प्राप्त होण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. नोकरदार वर्गाला प्रगतीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात यश मिळू शकतो. वैवाहिक जीवन चांगलं राहण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)