Budha Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी किंवा नक्षत्र बदल करतात. शनीदेव मीन राशीत वक्री करेल. तर व्यवसायाचा कर्ता बुध कर्क राशीत वक्री करेल, यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येईल. तुम्हाला आर्थिक व्यवहारांत यश मिळेल. पण नेमका कोणत्या राशींना हा फायदा होईल जाणून घेऊ…
वृषभ (Taurus Zodiac)
बुध- शनिदेवाची वक्री चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकते. शनिदेव तुमच्या राशीपासून ११ व्या घरात वक्री होतील. तसेच, बुध तुमच्या राशीपासून तिसऱ्या घरात वक्री होतील. या काळात बेरोजगार लोकांना नोकरीची संधी मिळेल. त्याचवेळी नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात विशेष प्रगती साधता येऊ शकते. त्यांना मोठी नफा होऊ शकतो.
कर्क (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी शनि- बुधाची वक्री चाल फलदायी ठरु शकते. या काळात तुम्हाला नशीबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला प्रवासाची संधी मिळेल. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात देखील सहभागी होऊ शकता. संवाद कौशल्याच्या जोरावर तुम्ही लोकांना आपलंस करु शकतात. तुम्ही शिक्षण, फॅशन किंवा आरोग्य क्षेत्रात काम करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकतो. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
मीन (Pisces Zodiac)
शनि- बुध वक्री मीन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरु शकते. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुम्हाला समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकते. प्रेम किंवा विवाहाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. मुलांशी संबंधित समस्या दूर होतील आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील. या काळात परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासह वेळ घालवल्याने नात्यांमध्ये गोडवा वाढू शकतो.