scorecardresearch

२९ की ३० ‘राम नवमी’ नेमकी कधी आहे? ‘या’ शुभ मुहूर्तावर प्रभु राम भक्तांना देणार आशीर्वाद, पाहा पूजा विधी

राम नवमी २०२३ ची अचूक तारीख, शुभ वेळ, पूजा विध सविस्तर जाणून घ्या.

shri ram navami 2023 ramnavmi date shubha muhurat and puja vidhi
रामनवमी २०२३ शुभ मुहूर्त आणि पूजा विधी (लोकसत्ता संग्रहित फोटो)

श्रीराम नवमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. भगवान राम यांच्या जन्मदिवस म्हणून देशभरात राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात, थाटामाटात साजरा केला जातो. यंदा गुरुवारी ३० मार्च रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान रामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला होता. म्हणूनच हा दिवस दरवर्षी भगवान रामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. रामनवमी उत्सवाच्या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा केल्याने सर्व दु:ख, संकटे दूर होऊन जीवनात सुख- समृद्धी येते असे शास्त्रात सांगितले जाते.

देशभरात रामनवमी उत्सवाच्या दिवशी मठ आणि मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत भगवान रामाची मनोभावे पूजा केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी तारीख ३० मार्च २०२३ एक गुरुवार आहे. या विशेष दिवशी चार अतिशय शुभ योग तयार होत आहेत, ज्यामध्ये भगवंताची आराधना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

राम नवमी २०२३ शुभ मुहूर्त ( Ram Navami 2023 Shubh Muhurat)

रामनवमी मध्यान्ह मुहूर्त सकाळी ११.११ पासून सुरु होईल आणि दुपारी १.४० वाजता समाप्त होईल.

नवमी तिथी सुरुवात: २९ मार्च संध्याकाळी ७.३७ पासून

नवमी तिथी समाप्त: ३० मार्च ते रात्री १० वाजेपर्यंत

शुभ वेळ

सर्वार्थ सिद्धी योग: संपूर्ण दिवस

गुरु पुष्य योग: रात्री ०९.२९ ते ३१ मार्च सकाळी ०६.१७ पर्यंत

अमृत ​​सिद्धी योग: रात्री ०९.२९ ते ३१ मार्च सकाळी ०६.१७ पर्यंत

श्री राम नवमी पूजा विधी (Ram Navmi 2023 Puja Vidhi)

रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर केशरमिश्रित दुधाने श्रीरामाचा अभिषेक करून राम चरित मानस पठण करा, असे शास्त्रात सांगितले आहे. वेळेच्या कमतरतेमुळे मानस पठण पूर्ण होत नसेल तर सुंदरकांड पठण करावे.

भगवान रामाचे जन्मस्थान ( Ram Mandir Ayodhya)

अयोध्या हे भगवान रामाचे जन्मस्थान असून अयोध्येत रामनवमीचा उत्सव विशेष साजरा केला जातो. अयोध्येला दूरवरून भाविक येत असतात. सरयू नदीत पवित्र स्नान केल्यानंतर भाविक भगवान रामाच्या दर्शनासाठी मंदिरात जातात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 09:53 IST

संबंधित बातम्या