Ram Navami 2023 Date: हिंदू पंचांग नुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला प्रभू श्रीरामाचा जन्म झाल्याचे मानले जाते. हिंदू धर्मात रामनवमी सणाला विशेष महत्त्व आहे. यंदा २२ मार्चपासून चैत्र महिन्याची सुरुवात होत आहे. यानुसार ३० मार्चला रामनवमी साजरी होणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार श्रीरामाचा जन्म त्रेतायुगात झाला तेव्हा चैत्र शुक्ल नवमीला पुनर्वसु नक्षत्रात कर्क राशीचा उदय झाला आणि मंगळ, शुक्र, सूर्य, शनि आणि गुरु हे पाच ग्रह उच्च स्थानात होते आले. यंदा शेकडो वर्षांनी रामनवमीच्या निमित्ताने अनेक शुभ योग सुद्धा जुळून आले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार येत्या रामनवमीला काही राशींच्या भाग्योदयाचे संकेत आहेत. या राशींना नेमका कसा लाभ होणार हे ही जाणून घेउया…

रामनवमीला जुळून आले खास पवित्र योग (Ram Navami 2023)

ज्योतिषशास्त्रानुसार राम नवमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी व अमृत सिद्ध योग जुळून आला आहे. यंदा पहिल्यांदाचा या दोन्ही योगांची तिथी गुरु पुष्य योग काळात जुळून येणार आहे. ३० मार्चला सकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी या दोन्ही योगांची तिथी सुरु होईल तर रात्री १० वाजून ५९ मिनिटांपर्यंत शुभ काळ कायम असणार आहेत.

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
27 March Daily Mesh To Meen Rashi Bhavishya
२७ मार्च पंचांग, राशी भविष्य: कुणाच्या नशिबी नात्यांचं प्रेम, सुख व गोडवा तर कुणाची वाढेल डोकेदुखी, आज काय होणार?
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

राम नवमी ‘या’ राशींना देणार प्रचंड लाभ?

सिंह (Leo Zodiac)

चैत्र नवरात्रीपासून ते राम नवमी पर्यंत सिंह राशीच्या कुंडलीत केवळ आनंदच आनंद लिहिलेला दिसत आहे. श्री रामाच्या कृपेने सिंह राशीच्या भाग्यात यशाची नांदी होऊ शकते. आपल्याला कर्जातून मुक्ती मिळू शकते. इतकेच नाही तर आर्थिक मिळकतीचे नवे स्रोत सुद्धा उघडू शकतात. तुम्हाला व्यवसायातून प्रचंड लाभाची संधी आहे.

वृषभ (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या मंडळींसाठी चैत्र रामनवमीचा दिवस अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. नव्या कामाच्या सुरुवातीला हा काळ शुभ ठरू शकतो. जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर वेळीच आणि सावनधपणे पाऊल उचलायला हवं. तुमच्या वाणीमुळे तुमचे आर्थिक ग्रह पालटण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा<< ६ एप्रिल २०२३ पर्यंत ‘या’ राशींचे नशीब चमकणार? शुक्र व लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकता प्रचंड श्रीमंत

तूळ (Libra Zodiac)

तूळ राशीच्या मंडळींसाठी यंदाची रामनवमी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते. तुम्हाला कुटुंबासह मोलाचे काही खास क्षण अनुभवता येईल. अविवाहित व लग्नासाठी उत्सुक मंडळींना मनपसंत स्थळ सांगून येऊ शकते. तुमच्या समाजातील प्रतिष्ठेत भर पडेल. आर्थिक फायद्यासाठी अत्यंत मोठी संधी येईल पण निर्णय अगदी काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)