Dainik Rashi Bhavishya In Marathi, 26 April 2025 : २६ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी सकाळी ८ वाजून २८ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरु होईल. रेवती नक्षत्र सकाळी ३ वाजून ३९ मिनिटांपर्यंत जागृत असेल. सकाळी ८ वाजून ४१ मिनिटांपर्यंत वैधृति योग जुळून येईल. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे शनिवारी मासिक शिवरात्री आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असणार आहे. तर आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार हे आपण जाणून घेऊया…
२६ एप्रिल पंचांग व राशिभविष्य (Aajche Rashi Bhavishya, 26 April 2025)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)
बौद्धिक चलाखी दाखवाल. तत्परतेने कामे कराल. आपल्या भावना उत्तम प्रकारे मांडाल. हसत खेळत कामे कराल. चिकित्सक नजरेने गोष्टी जाणून घ्या.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)
जामीनकीचे व्यवहार तूर्तास टाळावेत. प्रवासाचे बेत आखाल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. महत्त्वाचे कागदपत्रे तपासून पहावीत. चारचौघांत मिळून मिसळून वागाल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today in Marathi)
तरुण वर्गाशी मैत्री कराल. अधिकारी वर्गाची मदत मिळेल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. क्षणिक सौख्यात रमून जाल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)
मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. निसर्ग सौंदर्याची ओढ वाढेल. सर्वांशी आनंदी वृत्तीने वागाल. वातविकाराचा त्रास संभवतो.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)
सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. घरगुती वापराच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. आवडते खाद्यपदार्थ खायला मिळतील. अनपेक्षित लाभणे खुश व्हाल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)
परोपकाराची जाणीव ठेवाल. वैचारिक दृष्टिकोन सुधाराल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. दिवस मजेत जाईल. प्रकृतीची हेळसांड करू नका.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)
जुन्या कामातून लाभ संभवतो. कामे वेळेत पार पडतील. मानसिक द्विधावस्था टाळावी. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी मतभेद संभवतात.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)
प्रवासात सावधानता बाळगावी. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल. आशावादी दृष्टिकोन वाढीस लागेल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today in Marathi)
सामाजिक कार्यात भाग घ्याल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. स्वत:चा मान राखून वागणे ठेवाल. उपासनेला बळ मिळेल. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात.
मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)
कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. मन:शांतीसाठी ध्यानधारणा करावी. जवळचे नातेवाईक भेटतील. प्रेमप्रकरणातील घनिष्टता वाढेल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)
आततायीपणे निर्णय घेऊ नका. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. मनातील नैराश्य बाजूस सारावे. प्रवासाचा योग येईल.
मीन आजचे राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)
आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. हसत खेळत कामे साधून घ्याल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य वाढेल. व्यावसायिक लाभणे खुश व्हाल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर