Shukra Gochar 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर काही ना काही परिणाम होत असतो. शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे एक महिना लागतो. आता प्रेम, वैभव, ऐश्वर्या, धन यांचा कारक मानला जाणारा शुक्र ३१ मे ला मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचे हे संक्रमण सकाळी ११:१७ वाजता होईल. शुक्राचे राशी परिवर्तन काही राशींच्या नशिबाला कलाटणी देणार आहे. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांची कोणत्या रूपात भरभराट होऊ शकते हे पाहूया.

शुक्र गोचरमुळे ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार लाभ?

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे राशी बदल अत्यंत शुभ ठरु शकते. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोकांना आणि व्यावसायिकांना चांगले फायदे मिळू शकतात. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना यावेळी पदोन्नती मिळण्याचे संकेत आहेत. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राचे भ्रमण होताच कर्क राशीच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. करिअरमध्ये तुम्ही नवीन उंची गाठू शकाल. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. नोकरी-व्यवसायात प्रगती होऊ शकते. या वेळी केलेल्या गुंतवणुकीचे शुभ फळ मिळू शकते. तुम्हाला मोठ्या कंपनीत नोकरीची ऑफर मिळू शकते. या काळात परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्ही प्रेम संबंधात आनंदाचा अनुभव घ्याल.

कुंभ (Aquarius)

शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतात. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होऊ शकतात. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता राहील. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याचीही शक्यता आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)