Gajlakshmi Yog And Lakshmi Narayan Yog 2025: दैत्यांचा गुरू शुक्र काही काळानंतर आपली रास बदलतो आणि त्याचा परिणाम १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा प्रेम, आकर्षण, पैसा, मान-सन्मान आणि वैभव यांचा कारक मानला जातो.
ऑगस्ट महिन्यात शुक्र दोन राजयोग तयार करीत आहे, ज्यामुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाचं वातावरण तयार होऊ शकतं.
ऑगस्टमध्ये शुक्र कर्क राशीत बुधासोबत एकत्र येऊन ‘लक्ष्मीनारायण योग’ तयार करणार आहे आणि मिथुन राशीत गुरूसोबत एकत्र येऊन ‘गजलक्ष्मी योग’ तयार करील.
हे दोन्ही योग तयार झाल्यामुळे काही राशींसाठी हा काळ खूपच शुभ ठरू शकतो. चला तर मग, जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
वैदिक पंचांगानुसार २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करतील. तिथे आधीपासूनच गुरू बृहस्पती असतील. त्यामुळे गुरू आणि शुक्र यांच्या एकत्र येण्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होईल.
हरियाली तीज २७ जुलैला आहे आणि त्याच दिवशी हा गजलक्ष्मी योग तयार होतोय. हा शुभ योग २१ ऑगस्टपर्यंत राहणार आहे.
२१ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजून २५ मिनिटांनी शुक्र कर्क राशीत प्रवेश करील, जिथे आधीच बुध ग्रह असेल. त्यामुळे या दोन ग्रहांच्या युतीने लक्ष्मीनारायण योग तयार होईल.
मात्र, मिथुन राशीतील गजलक्ष्मी योगावर राहूची पंचम दृष्टी असेल. त्यामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात चतुराई, फसवणूक किंवा धूर्तपणा वाढू शकतो.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांच्या पहिल्या भावात गजलक्ष्मी योग आणि दुसऱ्या भावात लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या कामाचे कौतुक समाजात होऊ शकते.
तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. आई लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक स्थिती चांगली राहील. अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याचे योग खूप जास्त आहेत.
तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होऊ शकते, ज्याचा फायदा तुम्हाला मिळेल. घर, वाहन इत्यादी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
तुम्ही राजासारखं जीवन जगण्यात बऱ्याच अंशी यशस्वी होऊ शकता.
धनू राशी (Sagittarius Horoscope)
ऑगस्ट महिना या राशीच्या लोकांसाठी खूप चांगला ठरू शकतो. गजलक्ष्मी आणि लक्ष्मीनारायण योग यांच्या प्रभावामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि नोकरी-व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो.
वैवाहिक जीवनातील अडचणी हळूहळू कमी होऊ शकतात. जोडीदारासोबत चांगले संबंध तयार होतील. नातेसंबंध मजबूत राहतील.
कोर्ट-कचेरीचे प्रश्न असतील, तर त्यातही यश मिळण्याची शक्यता आहे.
व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. भागीदारीत चालणाऱ्या व्यवसायात फायदा होण्याचे योग आहेत.
अचानक पैसा मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते.
नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना मोठे यश मिळू शकते.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
शुक्राचे हे दोन राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकतात. या राशीच्या लोकांना कुठून तरी एखादी चांगली बातमी मिळू शकते.
विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिना खूप चांगला जाऊ शकतो. लक्ष्मीनारायण योग आणि गजलक्ष्मी योगामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीनुसार यश नक्कीच मिळेल.
तुमच्यात सर्जनशीलता (रचनात्मकता) वाढू शकते, ज्यामुळे फायदा होईल.
मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. मुलं होण्याची इच्छा असेल, तर ती पूर्ण होऊ शकते.
कमाईचे नवीन मार्ग खुलू शकतात. व्यवसायातही झपाट्याने वाढ होऊ शकते.
तुमच्या बोलण्याच्या शैलीमुळे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांत यश मिळवू शकता.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)