Shukra Gochar In Revati Nakshatra : दैत्याचे गुरू शुक्राला धन ऐश्वर्य, धन संपत्ती , प्रेम आकर्षण, वैवाहिक जीवन, इत्यादीचे कारक मानले जाते. शुक्र एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. राशींप्रमाणे तो नक्षत्र परिवर्तन सुद्धा करतो, ज्याचा थेट परिणाम १२ राशींच्या जीवनावर दिसून येतो. रेवती हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 27 व्या क्रमांकाचे नक्षत्र आहे. या नक्षत्राला माशाचे प्रतीक मानतात. ते पोषण, कला आणि समृद्धी दर्शवतात.

शुक्र १६ मे २०२५, शुक्रवारला दुपारी १२ वाजून ५९ मिनिटांनी रेवती नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. याचा थेट परिणाम काही राशींवर दिसून येईल.
शुक्राने रेवती नक्षत्रात प्रवेश केल्याने खालील पाच राशींना मोठा लाभ मिळू शकतो.

वृषभ राशी (Taurus Zodiac)

या राशीच्या लाभ भावात शुक्र विराजमान राहणार आहे. ज्यामुळे शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनामुळे या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तसेच यांना मोठा धनलाभ होऊ शकतो. यांच्या धन संपत्तीमध्ये चांगली वृद्धी होऊ शकते.

कर्क राशी (Cancer Zodiac)

या राशीच्या लोकांचे जमीन, घर वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या लोकांना अनेक धार्मिक यात्रा करण्याचे योग जुळून येईल. शुक्र नक्षत्र गोचरमुळे या लोकांचा भाग्योदय होईल. या लोकांवर प्रेम, पैसा, धनसंपत्तीचा वर्षाव होईल.

मकर राशी (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ कतो. या लोकांची बौद्धिक क्षमतेमध्ये चांगली वृद्धी होऊ शकते. या लोकांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ शकते. हे लोक मनाप्रमाणे त्यांचे आयुष्य जगतील. हा काळ या लोकांसाठी उत्तम राहीन.

तुळ राशी (Libra Zodiac)

या राशीचे लोक अध्यात्माकडे वळतील. शुक्र नक्षत्र गोचरमुळे या लोकांना व्यवसायात मोठी डील मिळू शकते. या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल.

मीन राशी (Pisces Zodiac)

मीन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. या लोकांना अपत्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. शुक्र नक्षत्र गोचरमुळे या लोकांचे नशीब बदलू शकते. यांना मोठा धन लाभ होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)