Malavya Rajyog Will Positive Impact These Zodiac Sign: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह वैभव, धन, प्रेम व भौतिक सुखाचा कारक मानला जातो. यामुळेच जेव्हा एखाद्या राशीत शुक्राचे गोचर होते तेव्हा त्याचे नशीब पालटायला सुरुवात होऊ शकते. विशेष म्हणजे येत्या २९ जून रोजी दुपारी २:१७ वाजता शुक्र स्वतःच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. शुक्राच्या या गोचरामुळे ‘मालव्य राजयोग’ तयार होत आहे, जो की पंचमहापुरुष राजयोगांपैकी एक मानला जातो. हा शुभ योग २६ जुलै २०२५ पर्यंत अस्तित्वात राहणार आहे. शुक्राच्या या शक्तिशाली योगामुळे काही निवडक राशींना जबरदस्त फायदे होण्याची शक्यता आहे. या राशींमध्ये करिअर, व्यवसाय, संबंध, संपत्ती आणि प्रतिष्ठेत प्रचंड सकारात्मक बदल दिसून येणार आहेत. कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी पाहूयात…

‘या’ राशींचं नशीब चमकणार?

मेष (Aries)

मेष राशीच्या दुसऱ्या भावात मालव्य योग तयार होत आहे. यामुळे या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ, खरेदी-विक्रीमध्ये यश, करिअरमध्ये मोठी संधी आणि पगारवाढ यासारखे फायदे मिळू शकतात. मीडिया, कला, संगीत क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकतो. तुम्ही या काळात देशांतर्गत आणि परदेशात प्रवास देखील करू शकता. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीत म्हणजेच शुक्र स्वतःच्या घरात विराजमान होत असल्यामुळे मालव्य राजयोग अधिक प्रभावी ठरणार आहे. सुख-संपत्ती, प्रेमजीवनात सुधारणा, आकस्मिक धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकणार आहे. व्यवसायातही लाभदायक संधी चालून येऊ शकतात. या काळात तुमच्या सुखसोयी आणि सुविधा वाढू शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेलं काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. यावेळी समाजात आदर वाढू शकतो.

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीत शुक्र चौथ्या भावात प्रवेश करणार असून, त्यामुळे वाहन किंवा घर खरेदी, पैतृक मालमत्तेचा लाभ, आर्थिक स्थैर्य आणि आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. भागीदारीचे काम करणाऱ्यांना लाभ मिळू शकतात. व्यापारी लोकांनी या काळात नव्या योजना राबविल्यास उत्तम यश मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. घरात शांती आणि आनंद नांदणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)